Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्य२६ वर्षीय तरुणाने गावाबाहेरील असणाऱ्या मंदिराच्या स्लॅबला गळफास घेऊन आत्महत्या...

२६ वर्षीय तरुणाने गावाबाहेरील असणाऱ्या मंदिराच्या स्लॅबला गळफास घेऊन आत्महत्या…

रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भोंदेवाडा येथे एका २६ वर्षीय तरुणाने गावाबाहेरील असणाऱ्या मंदिराच्या स्लॅबला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२५ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.

रामटेक – राजु कापसे

माहितीनुसार, रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भोंदेवाडा येथील रहिवासी अमोल बारकू कोहळे वय २६ वर्ष. याने गावाच्या बाहेर असलेल्या हनुमान मंदिराच्या स्लॅबला दुपट्टयाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या मृतकाने मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

गळफास घेतल्याची माहिती सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली असता गावातील माजी पोलीस पाटील चंद्रभान डोनारकर यांनी रामटेक पोलिसांना घटनेची माहिती दिली. रामटेक पोलीस घटनास्थळी पोहचले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले. मृत्यूचे कारण सद्या अस्पष्ट असून रामटेक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: