सांगली – ज्योती मोरे
बुधगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार सुधीर दादा गाडगीळ…
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्या नंतर तत्काळ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या ग्रामीण विकास निधीतून बुधगाव मध्ये १.५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.तसेच जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या प्रयत्नातून ३.२६ कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या शुभ हस्ते व सांगली जिल्हा अध्यक्ष दीपकबाबा शिंदे-म्हैसाळकर व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
संपूर्ण बुधगाव मध्ये १८ ठिकाणी मोटार सायकल रेलीच्या माध्यमातून सर्व मान्यवरांनी सर्व विकास कामांचे उद्घाटन केले. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वटसावित्री चौक येथे मोटारसायकल रॅलीचे रुपांतर सभेमध्ये झाले. सभेच्या ठिकाणी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपा ने केलेल्या विकासास ग्रामस्थांनी सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
सध्या बुधगावचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास ग्रामपंचायतीला मोठ्या अडचणी येत आहेत. हि बाब लक्षात घेऊन बुधगाव भाजपा पदाधिकार्यांनी बुधगाव कवलापूर विमानतळावरील जागेवर कचरा व्यवस्थापनास जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्याची मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले की बुधगाव गावचा विकास करूच गाव व तसेच विस्तार भागातील आपण केलेल्या मागणीनुसार सर्व कामे येणाऱ्या दोन वर्षात पूर्ण करू यासाठी निधीची कमतरता होऊ देणार नाही. भाजपचे जिल्हा अध्यक्ष दीपकबाबा शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थित सभा संपन्न झाली.
सभेच्या ठिकाणी गावातील अनेक प्रभागातील ग्रामस्थांनी उर्वरित समस्यांचे निवारण करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी मधून आलेले प्रसाद पाटील, शिवसेनेमधील राजू शिकलगार, पिंटू आवळे, इत्यादींचा भाजपा मध्ये समावेश करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जयवंत पाटील, राजेंद्र शिवकाळे, सुखदेव गोसावी, शहर अध्यक्ष संदीप गोसावी, भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस अशरफ वांकर सतीश मस्के, धनाजी पाटील,
विवेक लुगडे, प्रकाश गोसावी, विजय भाकरे, दिलीप तारळेकर, संजय चव्हाण, गजानन लाटणे, रोहित घाडगे, विकास पाटील, सयाजी पाटील , दिलावर पठाण, महेश माने, सुहास पोतदार, अजय कांबळे, सुशील घोडके, दत्ता म्हेत्रे, राजू घाडगे, उदय मोरे, आयुब सय्यद, रमजान मुजावर, संतोष परदेशी, शुभांगी कोळी, स्नेहल व्हणुंगरे, अश्विनी म्हेत्रे, शारदा मोरे, लीलाताई पाटील, आदी भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.