Saturday, September 21, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीतील सराफ कट्ट्यातून तब्बल एक किलो पंचवीस ग्रॅम चांदी चोरणाऱ्या सर्वात गुन्हेगारास...

सांगलीतील सराफ कट्ट्यातून तब्बल एक किलो पंचवीस ग्रॅम चांदी चोरणाऱ्या सर्वात गुन्हेगारास विश्रामबाग पोलिसांनी केले जेरबंद…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील सराफ कट्ट्यातून 1 किलो 25 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका चोरणाऱ्या गिरीश उर्फ आतिश सतीश मोहिते, वय-33, राहणार-भोईगल्ली, शांतीनगर खणभाग सांगली या रेकॉर्डवरील गुन्हेगारास विश्रामबाग पोलिसांनी खास बातमीदाराच्या माहितीनुसार सापळा रचून सांगली मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले आहे. सदर चांदीच्याजिन्नसाबद्दल चौकशी केली असता त्याने या पादुका सांगली सराफ कट्ट्यातून चोरल्याचे कबूल केले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधीकारी अजित टिके, यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे,

पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास मुंडे, पोलीस नाईक दरीबा बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप घस्ते, पोलीस कॉन्स्टेबल महंमद मुलानी, महिला पोलीस कॉन्स्टेबल भावना यादव आदींनी केली. सदर आरोपीकडून सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मुद्देमालासह आरोपीस शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: