Saturday, December 21, 2024
HomeMarathi News Todayआयबीने दिल्ली पोलिसांना केले सतर्क…१५ ऑगस्टपर्यंत दहशतवादी संघटना लष्कर आणि जैशच्या हल्ल्याची...

आयबीने दिल्ली पोलिसांना केले सतर्क…१५ ऑगस्टपर्यंत दहशतवादी संघटना लष्कर आणि जैशच्या हल्ल्याची भीती…

केंद्रीय गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना स्वातंत्र्य दिनासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. आयबीच्या अहवालानुसार 15 ऑगस्टपर्यंत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटना कोणताही हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात आयबीने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयबीने आपल्या 10 पानांच्या अहवालात लष्कर, जैश आणि कट्टरपंथी संघटनांकडून आलेल्या धमक्यांचे वर्णन केले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचाही या अहवालात उल्लेख आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या सूचनांमध्ये १५ ऑगस्टला कार्यक्रमस्थळी प्रवेशाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे म्हटले आहे. उदयपूर आणि अमरावतीमधील नुकत्याच घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आयबीने कट्टरपंथी गटांवर आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: