कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले
तामगाव (ता.करवीर) येथील शंकर मारुती पाटील यांच्या तामगाव मध्ये शेतात पाच दिवसापुर्वी 450 बकऱ्या खतासाठी बसवल्या होत्या गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोरखंडाच्या जाळीतुन अचानक वन्यप्रान्याने हल्ला करून 14 मेढ्या जागीच ठार झाल्या तर 4 मेंढ्या जखमी झाल्यात.
जखमी मेढ्यावर सागंवड्याचे पशुधन अधिकारी डॉ.प्रमोद लोखंडे, प्रकाश नाईक ,उपचारक सुरेश कोळी परिचर यांनी उपचार केले तर करवीरचे वनविभागाचे अधिकारी आर.एस.कांबळे ,वनपाल विजय पाटील, तलाठी दिपाली कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मेंढ्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्यांचे नेमके वर्णन सांगता येत नाही सभोवती फिरून पायाचे ठसे घेतले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नेमके कारण समजू शकणार आहे अशी माहिती वनपाल अधिकारी आर एस कांबळे अधिकारी यांनी दिली. अचानक झालेल्या हल्ल्यात मेंढ्या व कोकरू दगावल्याने आमचे लाखोचे नुकसान झाले आहेत तरी शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळ मालक पंडित धनगर व धुळा धनगर यांनी केली आहे