न्युज डेस्क – रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेला एक पाकिस्तानी चाहता आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी झेंडा फिरवत होता. मात्र, त्यांनी आपल्या देशाचा झेंडा उलटा धरला होता. हे पाहून एका भारतीय दर्षकाने त्याला हटकले आणि सांगितले की त्याने आपल्या हातात ध्वज उलट्या पद्धतीने धरला. भारतीय क्रिकेट चाहत्याने वारंवार सांगितल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्याला आपली चूक समजली आणि त्याने पुन्हा योग्य पद्धतीने झेंडा फडकवला.
छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, ‘आणि यांना काश्मीर हवे आहे.’ या व्हायरल व्हिडीओमध्ये भारतीय प्रेक्षकही हेच म्हणताना ऐकू येत आहेत.