अमरावती – वर्धा बडनेरा रेल्वे मार्गावरील मालखेड ते तीमटाळा स्टेशन दरम्यान मालगाडीचे वीस डबे रुळावरून घासरल्याची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असून यामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद केली असून घटनास्थळी रेल्वे रुलावरून डबे सुरळीत करण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे.
ऐन दिवाळीच्या दिवशीच नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत असून सर्व सुरळीत करण्यासाठी किती वेळ लागणार हे रेल्वे करून सांगण्यात आले नाही.
या मार्गावरील सर्व काही गाड्या या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे.