Friday, November 22, 2024
Homeराज्यनगरधन किल्ला परिसरात राबविले स्वच्छता अभियान...

नगरधन किल्ला परिसरात राबविले स्वच्छता अभियान…

– नगरधनमधील सामाजिक कार्यकर्ते व अपोलो करिअर अकॅडमीने राबविला उपक्रम

रामटेक – राजू कापसे

‘माझे गाव ,माझी जबाबदारी’,’स्वच्छ नगरधन, सुंदर नगरधन’या उपक्रमाअंतर्गत नगरधन येथील नंदीवर्धन कनिष्ठ महाविद्यालय,नगरधनचे प्राचार्य श्री.दीपकजी मोहोड, माजी ग्रा.पं.सदस्य केशवजी राऊत,सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक श्री.धर्मशीलजी वाघमारे,चेतन इखार,यांच्या पुढाकाराने नगरधन किल्ला परिसरात असलेल्या कागदी व प्लॅस्टिकयुक्त कचऱ्याचे संकलन करून व त्यास जाळून नष्ट करण्याचे काम आज 22 ऑक्टोबर रोजी नगरधन येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तसेच अपोलो करिअर अकॅडमीच्या संचालक व विद्यार्थ्यांनी केले.

किल्ला परिसरात नुकताच नवरात्र उत्सव व दसरा उत्सव साजरा झाला.या दरम्यान तेथे थाटण्यात आलेल्या दुकानांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.उत्सवाच्या समाप्तीनंतर दुकानदारांनी दुकाने उचलताना आपल्या दुकानासमोरील जागा स्वच्छ केली.मात्र नवरात्रोत्सव दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी व्हायची.याच पटांगणावर रावण दहनसुद्धा करण्यात आले होते.

अशाप्रकारे नवरात्रोत्सव व दसरा उत्सवासाठी जमलेल्या नागरिकांकडून व पर्यटकांकडून परिसरात प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या,कागदी कचरा,काचेच्या बाटल्या इत्यादींच्या रूपाने मोठ्या प्रमाणात केरकचरा किल्ल्याच्या बाहेरील परिसरात पसरला होता.

गावातील सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य दीपकजी मोहोड सर व माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.केशवजी राऊत,मुख्याध्यापक धर्मशीलजी वाघमारे,चेतन इखार यांच्या नजरेस ही बाब येताच त्यांनी हा केरकचरा नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला..सोबतीला सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्रजी दमाहे,शिक्षक डॉ.पवन कामडी, लिपीक श्री.मुन्ना बिरणवार,माणिक मोहारे यांना घेऊन केरकचरा साफ करण्यास सुरुवात केली.

या कार्यासाठी त्यांनी अपोलो करिअर अकॅडमी (पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र,नगरधन)चे संचालक श्री.आशिष देशमुख सर व श्री नितेश कुंभलकर सर यांना व त्यांच्या विद्यार्थ्यांना सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अपोलो करिअर अकॅडमीच्या संचालकांनी आपल्या 50-60 विद्यार्थ्यांसह केरकचरा प्रत्यक्ष संकलित करून तो नष्ट करण्यात मोलाची भूमिका बजावली.

अकॅडमीच्या तरुण-तरुणी विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने हे समाजकार्य केले.या उपक्रमात रामदास बावनकुळे, महेंद्र बिरणवार,रोहित सावरकर,देवीदास बावनकुळे,सूर्यभान खोडनकर,रवींद्र शेळके,अभिषेक अठराहे,भूषण नाटकर इत्यादी नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदान करून सहकार्य केले.

गावाचे सरपंच श्री.प्रशांत कामडी यांनी या उपक्रमाबद्दल उपक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या,उपक्रमात सहभागी झालेल्या,अपोलो करिअर अकॅडमीचे संचालक,विद्यार्थी या सर्वांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.तसेच प्रत्येक गावकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन अशा उपक्रमात प्रत्यक्ष स्वतः पुढाकार घेऊन गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: