Tuesday, November 26, 2024
Homeराज्यनगरधन ग्रा.पं. भवनाच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न...

नगरधन ग्रा.पं. भवनाच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न…

  • विविध राजकीय नेत्यांची कार्यक्रमाला हजेरी.
  • सव्वाचार कोटीच्या पाणी योजनेचे भूमिपूजन.
  • माजी सरपंच,उपसरपंच सचिवांचा सत्कार
  • प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

रामटेक – राजु कापसे

आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत तालुक्यातील सधन असलेल्या बोटावर मोजण्याइतपत ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या व लोकसंख्येच्या बाबतीत रामटेक तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नगरधन ग्रामपंचायत भवनाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा १८ ऑक्टोंबरला ग्रामपंचायत परिसरात हर्षोल्हासात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून प्रामुख्याने आ.श्री. सुनीलबाबू केदार (माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार सावनेर विधानसभा),

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.आशिषजी जयस्वाल (आमदार, रामटेक), श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक), सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा, जि.प. नागपुर), श्री.दुधरामजी सव्वालाखे (सदस्य,जि.प.नागपुर), नरेश धोपटे (माजी सदस्य, जि.प. नागपुर), कलाताई ठाकरे (माजी सभापती,पं.स.रामटेक),श्री.संजय नेवारे (सभापती, पं.स. रामटेक) , श्री. नरेंद्र बंधाटे (उपसभापती, पं.स. रामटेक),

अस्विता बिरणवार(सदस्य,पं.स. रामटेक),शंकरजी होलगिरे(माजी सदस्य,पं.स.रामटेक),सुनीलजी रावत,डॉ.रामसिंहजी सहारे,नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी,उपसरपंच अनिल मुटकुरे,ग्रामविकास अधिकारी श्री.नारायण कुंभलकर,नगरधन ग्रा.पं.चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान याच दिवशी नवीन इमारत उद्घाटनाच्या पुर्वी सायंकाळी ५ वाजता जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी टाकी व जलशुद्धीकरण या सव्वाचार कोटीच्या पाणी योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सायंकाळी सहा वाजता दरम्यान ग्रामपंचायत नगरधन भवनाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा सुरू झाला.यादरम्यान प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुनील बाबू केदार त्याचप्रमाणे आमदार आशिष जयस्वाल, माजी जि.प.अध्यक्ष रश्मीताई बर्वे,ग्रामपंचायत नगरधन चे सरपंच श्री प्रशांत कामडी, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी यावेळी भाषणातून आपले विचार व्यक्त केले . सुनील केदार यांनी ” नगरधन गावामध्ये रामटेक विधानसभेचे वारे बदलण्याची क्षमता आहे,तसेच सुनील केदार जो बोलता है वो करके दिखाता है ” असे म्हणत उपस्थितांची मने जिंकली.

तसेच आमदार आशिष जयस्वाल यांनी गाव विकासासाठी काही अडचण आल्यास तथा सहकार्य लागल्यास सरपंचांना सहकार्य करण्याची भावना दर्शविली. तसेच ग्रामपंचायत नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी यांनी आपल्या भाषणादरम्यान ‘गावाच्या विकासासाठी मला जे जे सहकार्य लागेल ते ते सहकार्य उपस्थित राजकीय मान्यवरांनी करावे व तसेच मला या गावाच्या विकासासाठी माजी राज्यमंत्री सुनील बाबू केदार यांचे ठिकठिकाणी व वेळोवेळी मोठे सहकार्य लाभलेले आहे’ असे यावेळी सांगितले.

तसेच आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतची नवीन इमारत तयार झाली व भरपूर विकासकामे झाली याचे समाधान व आनंद असल्याचेही ते म्हणाले. याच कार्यक्रमात नगरधन ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आजपर्यंतच्या सर्व माजी सरपंच,माजी उपसरपंच,माजी सदस्य यांना गावाच्या विकासात त्यांचे योगदान म्हणून कृतज्ञतापूर्वक सन्मानचिन्ह देऊन ग्रामपंचायततर्फे गौरविण्यात आले.

तसेच आपल्या कार्यकाळात गावाचा कायापालट करण्यात विशेष योगदान देणारे,बदली होऊन गेलेले नगरधनचे पूर्व ग्रामविकास अधिकारी श्री.पवनजी उईके यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ‘नगरधन ऐतिहासिक नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे ‘ या शीर्षकाचे नगरधनच्या किल्ल्याच्या प्रतिमेसह प्रतिबिंबित असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल एल.ए.डी.लायटिंगयुक्त फलकाचे अनावरणसुद्धा करण्यात आले. कार्यक्रमानंतर लगेच गावकऱ्यांना महाप्रसाद म्हणून स्नेहभोजन वाटप करण्यात आले…

ग्रामपंचायतच्या या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याकरिता ‘घेऊ भरारी प्रगतीची’ हा भंडारा ‘असर’ग्रुपचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.याद्वारे गावकऱ्यांना एक नागरिक म्हणून त्यांचे अधिकार व कर्तव्य यांची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन व मनोरंजन करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नगरधन ग्रामपंचायतद्वारे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी,सर्व सदस्य,कर्मचारी व समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन अतुल दमाहे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: