महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक वस्तूंचा वापर व विक्री करण्यावर बंदी घातली आहे.आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार आज रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ते ६ तपासणी करण्यात आली.क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४ वजीराबाद अंतर्गत पथकाने जुना मोंढा परिसरात अचानक पणे व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली असता बंदी असलेले प्लास्टिक आढळून आले. १८४ प्रतिष्ठान,फेरिवाले तपासणी करुन १६ व्यावसायिकांकडून १ लक्ष ५ हजार रु.दंड वसुल करण्यात आला. ४५० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.
आजची हि कारवाई अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त निलेश सुंकेवार (स्वच्छता) यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांचे क्षेत्रीय अधिकारी पंकज बावणे, क्षेत्रीय अधिकारी महेश चलवा तसेच क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४ चे क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव,रावण सोनसळे, व स्वच्छता निरीक्षक, पथकाने सहभाग नोंदविला.
महापालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये,कापडी पिशव्यांचा वापर करावा अशा कारवाया यापुढेही सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त (स्वच्छता) निलेश सुंकेवार यांनी आवाहन केले आहे.