महेंद्र गायकवाड
नांदेड
पीक विमा कंपनी हिंगोली येथील कार्यालयामध्ये दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंगोली शिवराज घोरपडे यांचा अपशब्द वापरून अपमान केल्या प्रकरणी नांदेड येथील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
राज्याच्या कृषी विकासामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शेतकऱ्यांच्या सेवेचा ध्यास घेऊन कृषी विभागातील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना अपमानित करणे व त्यांची मानहानी करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चर्चेदरम्यान त्या ठिकाणी उपस्थित सर्व जनतेसमोर कृषी विभागाचे अधिकाऱ्यांना वेठीस धरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना कानाखाली मारण्याची भाषा करून अपशब्द वापरले.
सदरची घडलेली घटना ही अतिशय अयोग्य असून त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात कर्तव्य बजावत असताना असुरक्षेची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाला आहे.
कृषी विभागातील सर्व संवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या माध्यमातून हिंगोली येथे झालेल्या घटनेचा निषेध करीत आहे. व आपला निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांचेमार्फत माननीय मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन सादर केले. व अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आपण ठोस उपाययोजना कराव्यात व कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांचे कोणीही अपमान केल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्याची सूचना शासन स्तरावर निर्गमित कराव्यात अशी विनंती करण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड आर बी चलवदे , प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड शिरफुले, किनवट- रणवीर आर डी, देगलूर- पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी शोभाग बोरा, तालुका कृषी अधिकारी नांदेड मोकळे एस बी, तंत्र अधिकारी- के एम जाधव, व्ही बी गीते, घुमनवाढ ए जी, विकास नारनाळीकर , श्रीमती गुंजकर ए एस ,वसंत जारिकोटे, तंत्र अधिकारी लिंगे, भाग्यश्री भोसले, एस यु सूर्यवंशी, एस एस पवार, एस पी कराळे, पी एच रावके , एस एम चातरमल, हांडे एल एम, गजानन पांडागळे, विनायक केळकर , संभाजी वडजे,दिलीप काकडे , कापसिकर बालाजी, अविनाश पोळ, प्रशांत सूर्यवंशी, राहुल दुधमल,आदींनी निवेदन सादर केले.