सांगली – ज्योती मोरे
चोरी, घरफोडी ,वाहन चोरी, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एल.सी.बी. चे पथक तासगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना एलसीबीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या पथकातील पोलीस नाईक सागर टिंगरे यांना, एक इसम तुरची फाट्यावर पेट्रोल पंपाजवळ रिव्हॉल्वर बाळगून उभा असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे छापा मारून किरण शामराव चव्हाण वय 24 वर्षे राहणार पाचवा मैल नागाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडून कमरेला लावलेले देशी वनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले. बेकायदेशीर रिव्हॉल्वर वापरल्याच्या गुन्ह्याखाली त्याच्या विरोधात सरकारतर्फे गिरीजापती टिंगरे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अच्युत सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव,
पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे, पोलीस नाईक सागर टिंगरे, पोलीस नाईक अनिल कोळेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग शिरतोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कॅप्टनसाहेब गुंडवाडे, पोलीस अंमलदार विक्रम खोत आदींनी केली आहे.