जुगार अड्ड्यावरील कार्यवाहीत विशेष पथकाकडून भेदभाव
पातूर : आज दि : १२/१०/२०२२ रोजी पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने विशेष पथक पातूर शहरात व जिल्ह्यात अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की एक इसम बस स्टँड पातूर व चार इसम ग्राम बेलतडा पातूर येथे अवैध रित्या वरली जुगाराचा आकड्यांवर नगदी पैश्याची हार जीत लावून जुगार खेळत आहेत.
तेथे पाहणी केली असता एक इसम १) देविदास तुळशीराम शिंदे वय ४२ रा.रेणुका नगर पातूर हा बस स्टँड पातूर येथे जुगार खेळताना मिळून आला त्याच्या जवळून वरली जुगाराचे साहित्य व रक्कम कॅश १,०४० रू. असा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो. स्टे. पातूर येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, व चार इसम हे ग्राम बेलतडा येथे जुगार खेळत असताना पोलसांना पाहून दोन इसम १) दिपक भाऊसिंग राठोड २)अशोक माखराम राठोड पळून गेले व दोन इसम १) सुनील शेषराव चव्हाण वय ३२ रा. ग्राम बेलतडा २) ब्रिजेश मुलचंद चव्हाण वय ३० रा. ग्राम बेलतडा यांना घटनास्थळी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळून वरली जुगाराचे साहित्य व नगद १,०६० रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो. स्टे. पातूर येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदर दोन कारवाहित ५ आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्या जळून एकूण २,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, व पो. स्टे. पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ,अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकांनी केली आहे.
पातूर शहरात विजय टॉकीज परिसरात तीन जुगार अड्डे राजरोसपणे सुरू असतात,या जुगार अड्डयाना पातूर पोलिसांची मूक संमती असल्याने ह्या अवैध धंद्यांना उत आला असताना आज विशेष पथकाने केलेल्या कार्यवाहीत एकमेकांशेजारी असलेल्या तीनही जुगार अड्डयांपैकी केवळ एकाच जुगार अड्ड्यावर कार्यवाही केल्याने सदर कार्यवाहिमध्ये विशेष पथकाने आपले हात ओले करून इतर दोन जुगार अड्यांन्ना विशेष पथकानेच अभय दिल्याची चर्चा सर्व स्तरावरून पातूर शहरात होत आहे.