अमोल साबळे
अकोला – नैसर्गिक आपत्तीअंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाचे वाटप करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यकांना समप्रमाणात गावे. वाटून द्यावी आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदतनिधी वाटप करावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना ३ ऑक्टोबरच्या पत्रान्वये दिले. तलाठ्यांनी त्यांच्या वाट्याचे ३३ टक्के काम सुरू केले; परंतु ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यकांनी कामाला सुरुवात न केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.सुपुर्द आहे.
अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात अधूनमधून अतिवृष्टी होऊन लाखो हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला. सर्वेक्षण आणि पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतनिधीसंदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला. त्यानुसार पाचही जिल्ह्यांना अपेक्षित निधीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक निधी करण्यात
निधी वाटप करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील महसूल यंत्रणेमार्फत पार पाडण्यास शासनाने मान्यता दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी अनुदान वाटपाकरिता तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यकांना समप्रमाणात गावे वाटून देण्यात यावीत आणि प्रत्येकी ३३ टक्के यानुसार शेतकऱ्यांना निधी वितरित करावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले; मात्र तलाठ्यांनी त्यांच्या हिश्शावरील काम सुरू केले असताना ग्रामसेवक व कृषी साहाय्यकांकडून या कामाला अद्याप आला सुरुवात झालेली नाही. यामुळे शेतकरी वैतागले आहेत.