सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नाव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एमआयडीसी कुपवाड सांगली यांच्यामार्फत दिनांक 9 ऑक्टोंबर 2022 रोजी कै. सुरजमलजी लुंकड यांच्या 39व्या पुण्यतिथी निमित्त सायंकाळी ठीक 5 वाजता. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ मा. श्री. स्वागतजी तोडकर यांचे घरगुती व निसर्ग उपचार पद्धतीने निरोगी आयुष्य कसे जगावे? या विषयावर अनमोल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
स्वागतजी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रा .लि. पुणे मार्फत हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रभावी जीवन जगण्यासाठी निसर्ग उपचार कसे प्रभावी ठरत आहे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन आपणास या कार्यक्रमात अनुभवता येईल तरी या मोफत कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .श्री .प्रवीण लुंकड यांनी केले आहे.
यावेळी सुरज फाउंडेशनच्या संचालिका सौ .संगीता पागनीस, मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.