आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात जवळपास 900 अंकांची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सेन्सेक्स 920.53 अंकांच्या वाढीसह 57,715.93 अंकांवर तर निफ्टी 285 अंकांच्या वाढीसह 17,172 अंकांच्या पातळीवर व्यापार करत आहे. याआधी मंगळवारी जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळाले होते.
अमेरिकन बाजारांनी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात तेजीने केली. यादरम्यान, डाऊ जोन्स 765 अंकांनी वाढून 22,941 वर तर नॅस्डॅक 240 अंकांनी वाढून 10,815 वर बंद झाला. S&P 500 2.5% वाढले. अमेरिकी बाजार मजबूत झाल्यानंतर आशियाई बाजारांमध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली.
SGX निफ्टी सुमारे 250 अंकांनी वाढून 17,100 च्या वर व्यवहार करत आहे. कोस्पी देखील सुमारे 2.3% वाढला. त्याच वेळी, जपानच्या निक्कीमध्ये सुमारे 700 अंकांची वाढ झाली. मंगळवारच्या बाजारात अदानी ग्रीनचे शेअर्स सहा टक्क्यांनी, तर हिंदाल्कोचे शेअर्स पाच टक्क्यांनी वधारले आहेत.