Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर…

राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या सुरक्षा ठेवीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या तपासानंतर देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप करत ईडीने गुन्हा दाखल केला होता.

ईडीच्या म्हणण्यानुसार, देशमुखने मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे 4.7 कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्याचे गृहमंत्री असलेल्या देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी आरोप नाकारले, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: