भारताच्या या लेकीने कमालच केली आहे, पुण्यात जन्मलेल्या नेहा नारखेडेने वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हा पराक्रम गाजवला आहे, हे सामान्य नाही. तिने IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये स्थान मिळवले आहे. श्रीमंतांच्या या यादीत ती सर्वात तरुण सेल्फ मेड वुमन उद्योजक आहे. नेहाचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले. मात्र, नंतर ती संगणकशास्त्र शिकण्यासाठी अमेरिकेत गेली.
नेहाने जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. ती Confluent ची सह-संस्थापक आहे. याशिवाय, अपाचे काफ्का ही ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टीम विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सध्या ती अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सल्लागार आणि गुंतवणूकदार म्हणून काम करत आहे. नेहा नारखेडे हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये 336 व्या स्थानावर आहे. त्यांची अंदाजे मालमत्ता 4700 कोटी रुपये आहे.
लिंक्डइन आणि ओरॅकलमध्येही काम केले आहे
स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी नेहाने लिंक्डइन आणि ओरॅकलसाठी काम केले. अपाचे काफ्का सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या टीमचा ती एक भाग होती. 2014 मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. ती 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत गेली होती आणि तिथून तिने पदव्युत्तर पदवी घेतली. पुणे विद्यापीठातूनच त्यांनी ग्रॅज्युएशन केले.
फोर्ब्सच्या श्रीमंत महिलांच्या यादीत नेहाने 57 वे स्थानही मिळवले होते. 2018 मध्ये, नेहा नारखेडेचे नाव फोर्ब्सने टेक संबंधित महिलांच्या यादीत समाविष्ट केले होते. हुरुन इंडियाच्या मते, 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या एकूण 1103 लोकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यादीत 96 जणांची वाढ झाली आहे.