राजु कापसे
रामटेक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांचे झंझावती विदर्भ दौऱ्यात रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्रात काम करणारे पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष यांचे कार्यप्रणालीचे केलेले कौतुक व पक्ष वाढिसाठी घेत असलेले परिश्रम बघुन, रामटेक क्षेत्रात अधिक मेहनत घेण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार मा. राजसाहेबांचे आदेशाचे पालन करीत माजी तालुका अध्यक्ष- श्री. शेखर दुंडे यांनी इतर पदाधिकार्यांचे सहकार्याने रामटेक ग्रामीण क्षेत्रात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु करीत सिंदेवाही तथा खिडकी गावातील असंख्य पुरूष व महिलांचा मनसेत पक्षप्रवेश केलेला आहे.
सोबतच ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे घरांची झालेली पडझड, नाली सफाई, घरकुल योजनेचे लाभ व इतर समस्यांचा शासकीय अधिकारी वर्गाला समक्ष बोलावून, कामे मार्गी लावून घेत ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. ज्याचे फलस्वरूप सिंदेवानी या गावकऱ्यात अजाबराव वरळी, सुदर्शन वरठी, शामलाल वरळी, विलास भलावी, साहिल खंडाते, गेंदलाल खंडाते, हिरामन भलावी, सुभाष भलावी, वसंत भलावी, रेखाबाई वरळी, नरेश भलावी, निकिता भलावी, राजकुमार वरळी, किशन भलावी, संपत खडाते, गणपत खडाते, तेजराम भलावी, सुषमा भलावी, प्रतिभा भलावी, निखिल खडाते
तथा खिडकी येथील महिला मंडळात इंदुबाई उइके, शिल्पा इनवाते, भागरती मरसकोल्हे, रंजना मरसकोल्हे, सविता मरसकोल्हे, कांचन उइके, अनिता इनवाते, कल्पना मरसकोल्हे, कांन्ता परतेती, शिल्पा खंडाते, रोशनी सलामे, दिशा मरसकोल्हे, शर्मिला परतेती, सुनिता मरसकोल्हे या सर्व पुरूष व महिलांनी पक्षात प्रवेश घेतला. यावेळी पक्षाचे सुखदेव मोरे, दिनेष माःढरे, राम गावडे, मनोज पालिवार, संदिप सलामे, सिताराम वरठी व इतर मनसैनिक उपस्थित होते.
आपला
श्री. शेखर गणपत दुंडे
माजी तालुका अध्यक्ष- रामटेक, नागपूर.