नरखेड–22
अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथे विधायक कार्याचे जनक स्व.अरविंदबाबू देशमुख स्मृतिदिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. युवराजजी चालखोर, कार्यवाह व्हीएसपीएम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, प्रमुख अतिथी मा. दिनकररावजी राऊत सहसचिव व्हीएसपीएम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, प्राचार्य डॉ. प्रकाश पवार,यांच्या शुभहस्ते स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री. कुलदीप हिवरकर, श्री. प्रीतम कावरे, जिल्हा परिषद सदस्य, श्री. शरदजी झुडपे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. भाविक मणियार व संच यांनी वैष्णव जनतो तसेच हीच आमुची प्रार्थना सादर करून स्व.अरविंदबाबू देशमुख यांना अभिवादन केली.
याप्रसंगी शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये महाविद्यालयामध्ये क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राध्यापक राजेंद्र घोरपडे तथा उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्यामुळे त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शारीरिक शिक्षण संचालक यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. मनोजकुमार वर्मा यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रॉस कंट्रीचे महाविद्यालयाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे डॉ.. सुनिल कापगते व श्री. विनोद तरारे यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात स्व. अरविंदबाबू देशमुख शिष्यवृत्ती योजने करिता वरिष्ठ महाविद्यालयातील सात पात्र विद्यार्थ्यांची निवड करून प्रत्येकी दोन हजार रुपये चा धनादेश प्रदान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या जीवकार्याची माहिती दिली पुढे बोलतांना ते म्हणाले स्व.अरविंदबाबूंनी गोरगरिबांसाठी जे कार्य केले तोच वारसा व्हीएसपीएम संस्थेचे अध्यक्ष मा.रणजितबाबूजी देशमुख पुढे चालवत असल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी मा.दिनकररावजी राऊत बोलतांना म्हणाले की,स्व.अरविंदबाबूनी शेतकरी व शेतमजूर यांच्या साठी कार्य केले असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.प्रकाश पवार यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र घोरपडे तथा प्रा.मानसी जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.नितिन राऊत यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.साधना जिचकार,डॉ.स्मिता गुडधे,डॉ.मेघा रघुवंशी, डॉ.रीता वाळके,डॉ.श्रीकांत ठाकरे,डॉ.शैलेश बंसोड,प्रा.विजय रहांगडाले,डॉ.दादाराव उपासे,प्रा.आशिष काटे,डॉ.अविनाश इंगोले,प्रा.प्रवीण वसू,वरिष्ठ,कनिष्ठ,एम. सी. व्ही.सी.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.