Sunday, September 22, 2024
Homeसामाजिकनवरात्रीमधे सांंगलीसह राज्यामध्ये होणार्या श्री दुर्गामाता दौडीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान सहभागी...

नवरात्रीमधे सांंगलीसह राज्यामध्ये होणार्या श्री दुर्गामाता दौडीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान सहभागी होणार…

सांगली – ज्योती मोरे

काल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगली शहरची विभागाची बैठक डेक्कन मॅन्युफॅक्चर्स हॉल, माधव नगर रोड येथे पार पडली. श्री दुर्गामाता दौड या बाबत हि बैठक होती. गेली ३५ वर्षे सांगलीत नवरात्रीमधे घटस्थापने पासून ते दसरा पर्यंत श्री दुर्गामाता दौड होते.

छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, आई तुळजाभवानी, जिजामातांचा जयघोष करत शिवतीर्थ, मारूती चौक पासून दुर्गामाता मंदिर पर्यंत दौडत दौडत येवून दुर्गामाता मंदिरात दुर्गामातेची आरती केली जाते व देव,देश, धर्माच्या कार्यासाठी आशिर्वाद व ताकद आम्ही देवीकडे मागत असतो. हि सांगलीतील परंपरा आहे.

काल पार पडलेल्या बैठकीत ३५ वर्षा पासून होणार्या श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवसापासून दौडीत सहभागी असणारे आनंदराव चव्हाण, रामभाऊ जाधव या दोन्ही जेष्ठ मार्गदर्शकांनी बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. सर्व जात – पात, पंथ, सांप्रदाय, पक्ष बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र येण्यासाठी हि दौड असते.

यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानच्या सहकार्यांना आवाहन केले की महाराष्ट्रातील जिल्हा, तालुकामधे जिथे दौड होत असेल तिथे सहभागी व्हा व जिथे श्री दुर्गामाता दौड होत नाही तिथे दौड सुरू करा. असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक, अध्यक्ष श्री. नितीन दादा चौगुले यांनी महाराष्ट्रातील सर्व युवा सहकार्यांना केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: