Thursday, January 9, 2025
Homeराज्यखा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोहा व कंधारच्या काँग्रेस तालुकाध्यक्षांसह अनेकांचा भाजप प्रवेश...

खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोहा व कंधारच्या काँग्रेस तालुकाध्यक्षांसह अनेकांचा भाजप प्रवेश…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या तापले असून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कंधार व लोहाच्या काँग्रेस तालूकाध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर हे उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष मुख्यालयात नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यामध्ये कंधारचे माजी पं.स. सभापती व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहाचे उपनगराध्यक्ष व काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मारतळाचे सरपंच भास्करराव पाटील ढगे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील जोमेगावकर, लोहाचे काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष उद्धव पाटील ढेपे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर डाकोरे,

कंधार काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नागोराव पाटील, लोहा-कंधार विधानसभेचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कमलाकर पाटील शिंदे, लोहा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील ढाकणीकर, शिराढोण सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोविंद पाटील कपाळे. दहीकळंबाचे सरपंच अवधूत पाटील शिंदे, मजूर फेडरेशनचे संचालक गजानन पांडागळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ताराकांत पाटील नरंगलकर यांचा समावेश आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: