Nagpur : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पती-पत्नीने 26 व्या लग्नाच्या वाढदिवशीनिमित्त आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.
नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जेरील डॅस्मन ऑस्कर मोनक्रिफ (५४) आणि ॲनी जेरील मोनक्रिफ (४५) असे मृत जोडप्याचे नाव होते. हे जोडपे अनेक दिवसांपासून मूल होत नसल्याने चिंतेत होते. त्यांच्या लग्नाला 26 वर्षे उलटून सुद्धा मूल झाले नाही. दोघांनीही मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर स्टेटस अपडेट केले आणि एकावर स्टॅम्प पेपर आणि दुसऱ्यावर अनौपचारिक मृत्यूपत्रासह दोन सुसाईड नोट अपलोड केल्या. या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यात म्हटले आहे.
जेरीनने साथीच्या आजारात नोकरी सोडण्यापूर्वी अनेक हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केले. ते हॉटेलमधील त्याच्या कामावर परतला नाही. जेरील व्याजाने कर्ज देत असे, तर ॲनी गृहिणी असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
सोमवारी रात्री दोघेही फिरायला गेले होते. यानंतर दोघांनी जेवण केले आणि घरी परतले. जरिल आणि ॲनी यांनी सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला अणि सर्व काही ठीक असल्याचेही सांगीतले. त्यानंतर मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास पत्नी ॲनीने व्हिडीओ बनवून नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना त्यांच्या नात्यात असलेला लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलू नका अशी विनंती केली. यानंतर दोघांनीही घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केली. लग्न सोहळ्यात वापरले जाणारे कपडे परिधान करुन त्यांनी जीवनयात्रा संपवली.
सकाळी १० वाजून गेल्यानंतरही जरिल आणि ॲनी उठले नसल्याने शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांचा घरी गेली. मात्र, दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे महिलेने खिडकीतून पाहिले असता दोघीही पती पत्नीने घरी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास करत आहे.
#Nagpur | A couple partied hard till well past midnight with friends and relatives to celebrate their 26th marriage anniversary and barely had the fun, frolic and laughter died down, when they dressed up in their wedding attire and embraced death in the quiet confines of their… pic.twitter.com/ubzwSshmfD
— The Times Of India (@timesofindia) January 8, 2025