पाेलिस अधीक्षक अकोला कार्यालयावर धडकला निषेध माेर्चा एसपींना दिले निवेदन…
पातूर – सचिन बारोकार
मनोज जरांगे पाटील हे चिथावणीखाेर वक्तव्य करून मराठा व ओबीसी समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करीत आहेत, असा आराेप सकल ओबीसी समाज बांधव व वंजारी समाज सेवा फाउंडेशनने मंगळवारी केला. समाजबांधवांनी अकोला पाेलिस अधीक्षक कार्यालयावर निषेध माेर्चा काढत संताप व्यक्त केला.
कारवाईसाठी पाेलिस अधीक्षकांनाही निवेदनही सादर करण्यात आले. माेर्चात प्रथम स्व. संताेष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाेलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार मनोज जरांगे पाटील यांनी ४ जानेवारी राेजी परभणी येथील जाहीर सभेमध्ये ओबीसी तथा वंजारी समाजाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असे चिथावणीखाेर वक्तव्य केले. तसेच त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली.
हे भाष्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचा जीवितास धोका निर्माण करून देशातील बंधुत्वास धोका निर्माण केल्यासारखे आहे. जरांगे हे कोणतीही खातरजमा न करता भाष्य करीत असल्याने मुंडे यांच्या प्रतिमेस धक्का पाेहाेचला आहे. कुटुंबास धोका निर्माण झाला आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
वादग्रस्त वक्तव्य राजकीय सुडापाेटी
मनाेज जरांगे हे वादग्रस्त वक्तव्य राजकीय सुडापाेटी करीत असल्याचा आराेप सकल ओबीसी समाज बांधव व वंजारी समाजाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक शांतता भंग हाेत आहे. राज्यातील एका मंत्र्याबाबत अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणे याेग्य नाही. एखाद्या न्याय प्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करून समाज विघातक बाेलणे उचित नाही, असे समाजाचे म्हणणे आहे. ना धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावाही समाजातर्फे करण्यात आला आहे.
असा निघाला माेर्चा
सकल ओबीसी समाज बांधव व वंजारी समाज सेवा फाउंडेशनतर्फे माेर्चात सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात आले. त्यानुसार दुपारी समाजबांधवांचा एसपी कार्यालयावर निषेध माेर्चा धडकला. माेर्चेकरांनी हातात धरलेल्या फलकावर जाहीर निषेध माेर्चा नमूद केले हाेते. मनाेज जरांगे, भाजप आमदार सुरेश धस, अंजली दमानिया’ यांची छायाचित्रे हाेती. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात आली