Wednesday, January 8, 2025
Homeराज्यदोन दुचाकीमध्ये आमोरासामोर धडक : दोघे ठार, मृतकात देवलापार पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश...

दोन दुचाकीमध्ये आमोरासामोर धडक : दोघे ठार, मृतकात देवलापार पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश…

रामटेक – राजु कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत पवनी ते हिवराबाजार रोडवर आमोरा समोर झालेल्या मोटर सायकलच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २ जानेवारी गुरुवार रात्री ८ वाजताच्या सुमारास तुमडीटोला शिवारात घडली होती.

मृतकाचे नाव शुभम जयदेव उईके राहणार अकोला (हिवराबाजार) असे तर गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी क्रांतीचंद हराळ वय ३२ राहणार देवलापार होते.

प्राप्त माहितीनुसार, मृतक शुभम हा पवनीकडून मूळ गाव अकोला येथे त्याची मोटर सायकल पल्सर क्र एम एच ४० सी आर ०४१३ ने जात होता. अपघातात गंभीर जखमी असलेले देवलापार पोलीस स्टेशनचा कर्मचारी क्रांतीचंद हराळ वय ३२ वर्ष, हे त्यांचे बीट मध्ये गेले होते. वरघाट येथे टी पाईंटवर गेले असता त्यांना पवनीच्या दिशेने तुमडीटोला येथे जायचे होते. त्यांनी त्यांची कार वरघाट टी पाईंटला उभी केली.

तेथे बसुन असलेले वरघाट निवासी संजय बावीसताले यांची हिरो होंडा मोटर सायकल क्र एम एच ४० बी झेड ७६१८ ने तुमडीटोला फाट्यावर त्यांची वाट पाहत असलेल्या व्यक्तीला भेटायला निघाले असता अंदाजे १ किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने मृतक शुभम हा भरधाव वेगाने येऊन क्रांतीचंदला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्यावर जोरात आदळले. यात गाड्यांचा मात्र अक्षरश: चुराडा झाला. दोघेही गंभीर जखमी झाले. देवलापार पोलीसा़ना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायन तुरकुंडे घटनास्थळी पोहचले.

दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचारानंतर शुभमला नागपूरच्या मेडीकलमध्ये तर क्रांतीचंदला कामठीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यात शुभमचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्रीच मेडीकलमध्ये मृत्यु झाला, तर पोलीस कर्मचारी क्रांतीचंद हराळ यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कामठी वरून नागपूरला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र मृत्युशी झुंज देत असतांनाच दि. ४ जानेवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्राण सोडले.

कर्तव्य बजावत असतांना आलेल्या मृत्यूने समस्त पोलीस विभागात दुःख पसरले असून अशा या पोलीस कर्मचाऱ्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: