Sunday, January 5, 2025
Homeराज्यबालविवाह मुक्त आणि बाल शोषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा...

बालविवाह मुक्त आणि बाल शोषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा – राजीव भारद्वाजॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन् प्रकल्पांतर्गत स्वंयसेवी संस्थाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न…

अकोला – विलास सावळे

आपण दररोज विविध न्यूज चॅनल बघतो, वर्तमानपत्रे चाळत असताना मोठ्या प्रमाणावर बाल अत्याचाराच्या, शोषणाच्या घटना,बातम्या नजरेस पडतात आणि मन सुन्न होते. अजूनही आपण बालकांकडे केवळ आपले शोषण करण्याचे साधन बघतो आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत.

बालमजुरी ची संख्या अधिक दिसून येत आहे. हे थांबवण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन एक्सेस टू जस्टीस चे नेटवर्किंग प्रमुख राजीव भारद्वाज यांनी दिनांक 29 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संस्थांना मार्गदर्शन करताना केले.

ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पांतर्गत बाल हक्क संरक्षणासाठी कार्य करीत असलेल्या महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था प्रतिनीधीसाठी दिनांक 28-29 डिसेंबर 2024 रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण जल भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), छ.संभाजीनगर येथे संपन्न झाले.

या प्रशिक्षणात बाल विवाह मुक्त भारत, बाल लैंगिक शोषण,बाल दुर्व्यापार, तस्करी यासारख्या विषयावर प्रमूख मार्गदर्शक राजीव भारद्वाज,मो.झाकीर रियाज,मास्टर ट्रेनर श्रीमती संगीता,अभय अवस्थी,माधवी घोडके यांनी प्रशिक्षण सत्र घेतले. महाराष्ट्रातील बालकांचे प्रश्न व त्यांच्या हक्क याची सद्यस्थिती चा आढावा घेऊन बाल संरक्षणासाठी प्रभावी धोरणे व कायद्याचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.

समाजामध्ये बालक संरक्षण बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत भागीदार संस्थांचे कर्मचारी यांची क्षमता बांधणी करणे यावर दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. बाल संरक्षणासाठी जनतेला जागरूक करण्यासाठीं संस्था प्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण सत्रामध्ये एक्सेस टू जस्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाची अकोला जिल्हा भागीदार संस्था इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी अकोला चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, सपोर्ट समन्वयक सपना गजभिये समन्वयक यांच्यासह महाराष्ट्रातील संस्थांचे एकुण ७६ जणांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी ॲड.अशोक पवार,दीपक त्रिपाठी रामेश्वर भाले,वैभव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: