Sunday, January 5, 2025
Homeराज्यनांदेड | मद्यप्राशन करून वाहन चालवीणाऱ्यावर व हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई करणार -...

नांदेड | मद्यप्राशन करून वाहन चालवीणाऱ्यावर व हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई करणार – जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड – आगामी येणाऱ्या नुतन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने काही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन कोणीही मद्य प्राशन करुन वाहन चालविणार नाहीत.

तसेच ट्रीपल सिट, विदाऊट लायसेन्स तसेच भर वेगात वाहण चालवु नये जेणे करून अपघातास कारण होईल असे कृत्य करु नये तसे अढळल्यास गंभीर स्वरुपाची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तसेच ड्रंक अॅन्ड ड्राव्यु च्या केसेस करण्यात येतील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे.

तरुण मंडळींनी हुल्लडबाजी न करता व वाहने भर वेगाने वेडीवाकडी चालवीत इतरांना त्रास न देता नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,किर्तीका मॅडम सहा. पोलीस अधिक्षक नांदेड शहर व सुशीलकुमार नायक उप. विभागीय पोलीस अधिकारी नांदेड इतवारा यांनी  केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: