Sunday, January 5, 2025
Homeराज्यतिर्थक्षेत्र लाखपुरी येथे सोमवती अमावस्या निमित्य भाविकांचा जनसागर...

तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे सोमवती अमावस्या निमित्य भाविकांचा जनसागर…

श्री लक्षेक्ष्वर संस्थानने पुरवल्या विविध सुविधा…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले / विलास सावळे

मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावरील पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे पूर्णा नदी घाटावर आज सोमवती अमावस्या निमित्त व पौष मासाला लागून आलेल्या या सोमवतीनिमित्त आपल्या पूर्वजांना मिळवण्याची विधी पार पाडण्याकरिता अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील हजारो भाविक आज श्री लक्षेश्वर नगरी लाखपुरी येथे सकाळपासून दुपार पर्यंत उपस्थित झाले.

भाविकांच्या सोयीसाठी श्री लक्षेश्वर संस्थान तर्फे मंदिर परिसर व पूर्णा नदी घाट परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,वाहन पार्किंग , मंडप व्यवस्था , तैराकी पथक , प्रसाद व्यवस्था करण्यात आली होती .तसेच भाविकांना लागणाऱ्या वस्तूचे अनेक दुकान या यात्रे निमित्य व्यापाऱ्यांनी थाटली होती.

आपल्या पूर्वजांना मिळवण्याचा विधी पार पाळण्याकरिता अनेक ब्राह्मण व न्हावी पूर्ण घाटावर उपस्थित होते . यावेळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता. सोमवती यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी श्री लक्षेश्वर संस्थांचे अनेक सेवाधरी आज कार्यरत होते.

संस्थांची प्रगती व सेवाधार्‍यांची सेवा याबाबत अनेक भाविकांनी आज समाधान व्यक्त केले तसेच शासनाने नदीपर्यंत रस्ता व नदीवर घाट तयार करून भाविकांची सोय करावी असे मत आपले विचार या संस्थांच्या वहीत अधोरेखित केले. अशी माहिती श्री लक्षेक्ष्वर संस्थान तर्फे देण्यात आली .

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: