पातुर – निशांत गवई
दि.26/12/2024 रोजी वनविभागाचे कार्यवाहीमध्ये पशु वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालास लागून असलेल्या देवानंद जयराम गवई, रा. पातूर ता. पातूर जि. अकोला यांचे कोठ्यामध्ये अवैध रित्या सागवानांची तस्करी करुन चौरस तयार करण्याचे काम सुरु असल्याचे गुप्त माहिती श्री. पी. डी. पाटील, वनपाल पातूर वर्तृळ यांना मिळाल्यावरुन त्यांनी मौका ठिकाणी जावून सुरु असलेल्या चौरस नग तयार करण्याचे कामांची विचारणा केली.
परंतू सदर इसम नामे देवानंद जयराम गवई, यांनी सांगण्यास टाळाटाळ करून मौक्याचा फायदा घेत फरार झाला. नंतर सदर ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एस.डी. गव्हाणे, साहेब सह इतर कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांचे संयुक्त पथकाने आरोपी नामे देवानंद जयराम गवई, रा. पातूर यांचे घराची व त्यांचे कोठ्याची झडती घेतली असता सागवान कटसाईज नग 182 घ.मी 0.373 रु.35, 161/- किंमतीचे सागवान चौरस नग,
आरीपत्ते 05 नग, कुन्हाड 1 नग, हातकरवत – 1 नग, सिकंजा – 1 नग, चैन सॉ मशीन 1 अंदाजे एकूण रु. 4,800/- एकूण एकंदर रु.39,961/- अक्षरी ( एकोणचाळीस हजार नऊशे एकसष्ट रुपये फक्त) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 52 महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम्यम 31, 53, 82 अन्वये वनगुन्हा क्र.01579/2/2024 दि.26/12/2024 जारी केला.
सदर कार्यवाही मध्ये पातूर वनपरिक्षेत्रामधील कर्मचारी तसेच पोलीस विभागामधील मा.. पोलीस निरिक्षक श्री. एस. आर. मेश्राम, साहेब व त्यांचे अधिनिस्त पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदवीला असून श्री. कुमारस्वामी उपवनसंरक्षक, श्री. एस. के. खुणे, सहायक वनसंरक्षक (भ.व.) अकोला व श्री.एस.डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.पी.डी. पाटील, क्षेत्रसहायक पातूर वर्तुळ हे पुढील तपास करित आहेत.