21 डिसेंबर ‘जागतिक ध्यान दिन’निमित्ताने परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग ध्यान केंद्र अकोला जिल्हा सामूहिक ते तर्फे शासकीय औद्योगिक संस्था मुर्तीजापुर येथे कुंडलिनी जागरण व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष स्थानी संस्थेच्या प्राचार्य सौ काकडे मॅडम, अकोला जिल्हा समन्वय गणेश कोथळकर,रिजनल समन्वयक, संदीप मोरे, अंकुश चनने,सीमाताई जौंजले सौ प्रीती कंकाळ, डॉ. पौर्णिमा अवघाते प्रामुख्याने मंचकावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरशीर्भाते सर यांनी केले व मार्गदर्शन श्री संदीप मोरे सर जीवनात सहजयोग ध्यान आवश्यक, ध्यानाचे फायदे त्याचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक ध्यान करून घेतल्या गेले.
सहजयोग ध्यान सदस्य श्री निशांत नवघरे, ठाकूर,कांडलकर, रौंदळकर मॅडम सहजयोग ध्यान सदस्य उपस्थित होते. शासकीय औद्योगिक संस्थेचे शिक्षक व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन सहजयोग सदस्य प्रति कंकाळ यांनी केले.