Thursday, December 26, 2024
Homeराज्यस्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाने ग्राहकांसाठी आफ्टरसेल्स इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले...

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाने ग्राहकांसाठी आफ्टरसेल्स इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले…

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल)चा ठाम विश्वास आहे की, ग्राहक हा नेहमी केंद्रस्थानीच असला पाहिजे. ग्राहक अनुभव अधिक सुधारण्यासाठी एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने गेल्या एक दशकात देशभरात आपल्या रीजनल डिस्ट्रिब्यूशन सेंटर म्हणजे प्रादेशिक वितरण केंद्रांचे क्षेत्र दुप्पट करून ५२००० चौ. मी. केले आहे.

या वचनबद्धतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडेच पुणे प्रादेशिक वितरण केंद्रामध्ये ८००० चौ. मी. ची केलेली वाढ आहे. आता त्याचे क्षेत्रफळ ३३,००० चौ. मी. झाले आहे. हे संचालन कार्यक्षमता आणि ग्राहक सेवेत नवीन मानक स्थापन करणारे आहे. पुणे प्रादेशिक वितरण केंद्राव्यतिरिक्त, या समूहाकडे देशभरातील ग्राहकांच्या सेवेसाठी एनसीआर आणि बंगळूर येथे धोरणात्मक रित्या उभी केलेली पार्ट्स वितरण केंद्रे देखील आहेत.

ही सुविधा भारतातील स्कोडा, फॉक्सवॅगन, ऑडी, पॉर्श आणि लॅम्बॉर्गिनी या पाच महत्त्वाकांक्षी ब्रॅंड्सचे पार्ट आणि अॅक्सेसरीजचे व्यवस्थापन करते. देशातील बाजारपेठेची सेवा करणे हे प्राथमिक ध्येय ठेवून ही सुविधा आंतरराष्ट्रीय बाजाराचे देखील समर्थन करते. हा विस्तार आपल्या ग्राहकांसाठी विक्री आणि सेवा वाढविण्यासाठी समूहाच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे एमडी आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “आपल्या मालकीची कार असणे यात केवळ मोबिलिटी नाही, तर अनेक आठवणींचा समावेश असतो. उत्तम रीजनल डिस्ट्रिब्यूशन सेंटर्स असल्यामुळे पार्ट्स आणि कॉम्पोनन्ट्सच्या वितरणासाठी टर्न अराऊंड टाइम कमी करता येऊ शकेल. व त्यामुळे ग्राहक अनुभव सुधारेल. आमच्या कारची मालकी असणे हा ग्राहकांसाठी एक सुंदर प्रवासाचा अनुभव व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्याशी होणारा प्रत्येक संवाद ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल याची खातरजमा आम्ही करत आहोत.”

ग्राहक सेवा म्हणजे केवळ त्यांच्यासाठी उत्तमोत्तम कार्स सादर करणे नाही. म्हणूनच तर एसएव्हीडब्ल्यूआयपीएल ने २०२४ मध्ये आपले टचपॉईंट्स वाढवून ५४० केले आहेत, ज्यामुळे देशभरात एक विश्वसनीय आणि व्यापक सेवा नेटवर्क तयार झाले आहे. नेहमीचा मेंटेनन्स असो, किंवा तातडीने मदत हवी असो, तज्ञ साहाय्य देशभरात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

ही धोरणात्मक गुंतवणूक वर्तमान आणि नव्या प्रॉडक्ट लाइन्सचे समर्थन करत भारतीय बाजारांसाठी स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाची वचनबद्धता अधोरेखित करते. अस्सल पार्टसची झटपट आणि निर्बाध उपलब्धता सुनिश्चित करून विस्तारित प्रादेशिक वितरण केंद्र ग्राहकांचा एकंदर मालकीचा अनुभव सुधारण्यासाठी आणि या प्रांतातील समूहाची सेवा उपस्थिती सुदृढ करण्यासाठी सज्ज आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: