कारंजा लाड वाशीम
वर्धमान कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे २३ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. वर्षा राठोड मॅडम (अध्यक्ष, वर्धमान फाउंडेशन) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच मान्यवर अखिल मस्के सर, विशाल इंगळे, श्रुती भगत, पवन मानकर, हरीश गाडे व वैष्णवी कोल्हे तसेच नर्सिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ख्रिसमस साजरा करताना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक सजावट आणि उत्साही वातावरण यामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदमय झाला. कार्यक्रमाने सर्वांना ख्रिसमसच्या सणाचा खरा अर्थ आणि एकत्र येण्याचा आनंद दिला.
महाविद्यालय प्रशासनाने सर्व पाहुण्यांचे आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले, ज्यांनी हा कार्यक्रम संस्मरणीय करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.