रामटेक – राजु कापसे
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या शुभ हस्ते जगप्रसिद्ध मनसर मधिल रामधाम मध्ये सुवि बर्ड पार्क चे भुमिपूजन करण्यात आले.
दिनांक 21 डिसेंबर रोजी भुमिपूजन सोहळ्यात रामधाम चे सस्थापक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी शॉल व पुष्पगुच्छ देवून केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांचे स्वागत केले .
भारतातील पहिल्या बायो – बिटूमेन नविन टेक्नॉलॉजी निर्मित नागपूर जबलपूर महामार्गावरील मनसर ते आमडी गावापर्यंत 2 किलोमीटर डांबर रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतुक व महामार्ग, भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतातील तणस, कापसाचे झाड , खराब झालेल्या टायराचा बारीक चुरा, बांबु वनस्पती इत्यादी पासुन नविन टेक्नॉलॉजी ने डांबर निर्मित केल्या जात असुन त्याचे प्रात्यक्षीक मनसर ते आमडी महामार्गावर 2 किलोमीटर डांबर रोड तयार करण्यात आला असून लागणारा खर्च ही कमी असेल व सध्याच्या डांबरापेक्षा उच्च दर्जाचे डांबर बायो वेस्ट पासुन तयार करण्यात येणार असल्याचे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी पत्रकारांना संबोधीत करतांना माहीती दिली.