मूर्तिजापूर प्रतिनिधीं
राजस्थानातील कोटा शहरात २३ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित तीन दिवशीय ‘कोटा महोत्सवा’साठी देशभरातील ३०० प्रींट व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात आयोजित या महोत्सवात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातून ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर व बुलडाणा जिल्ह्यातून राजेश राजोरे यांना विशेषत्वाने निमंत्रीत करण्यात आले आहे. ते आज दिनांक २२ डिसेंबर रोजी या महोत्सवासाठी रवाना झाले आहेत.
राजस्थान राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित या समारोहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिझोनन्स आणि कोटा ॲडमिनीस्ट्रेशन चे विजयसिंग देशमुख व निधी श्रीवास्तव यांनी या महोत्सवाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय नियोजन केले आहे.
या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त विविध उपक्रमांबाबत विश्लेषणात्मक चर्चा व मंथन होईल. येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांच्या या महोत्सवातील सहभागासाठी येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख, प्रा.दीपक जोशी, विलास मुलमुले, अनिल अग्रवाल, दीपक अग्रवाल, संजय उमक, अजय प्रभे,राजेंद्र मोहोड,प्रतिक कुऱ्हेकर, विलास नसले,
बाळासाहेब गणोरकर,महाव्हाईस गजानन गवई,अनवर खान, विशाल नाईक,रोहीत सोळंके, मिलींद जामनिक, जयप्रकाश रावत, अंकुश अग्रवाल, गौरव अग्रवाल, पंकज सातपुते,अतहर खान, श्याम वाळसकर, मोहम्मद रिजवान,शारीक कुरेशी, नागोराव तायडे, धनराज सपकाळ, प्रविण ढगे, उद्धव कोकणे,सैफी पठाण, सुमित सोनोने, रवि खिराळे, मोहम्मद शब्बीर, अतुल नवघरे, गजानन गवई, आकाश जामनिक यांच्यासह पत्रकार बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.