भंडारा – सुरेश शेंडे
परभणी येथील भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेबांच्या पुतळा परिसरातील संविधान शिल्पाची विटम्बना व अपमान करणाऱ्या समजकंटकान्ना तसेच आम्बेडकरी कार्यकर्त्यांच्या मृत्युस कारणीभूत पोलिस अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कृतिचा निषेध व कारवाई म्हणून असित बागडे,अजय मेश्राम , विनय बनसोड,विनीत देशपांडे याच्या नेतृत्वाखाली दि.21 1डिसेम्बर 24 ला परभणी हत्याकांड व दंगल विरोधी कृती समिती भंडारा तर्फे भंडारा बंद व निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले.
यात सकाळी 500 आंबडेकरिन युवकांनी बाईक रॅली काढली शहरातील लहान मोठे प्रतिष्ठाण स्वतःहून बंदमध्ये सहभागी होऊन बंद ला शहरातील नागरिकांनी मोठा सहकार्य केला,बाईक रॅली शास्त्री चौक येतून गांधी चौक पोस्ट ऑफिस चौक मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, जिल्हापरिषद चौक , गणेशपुर ,खात रोड परिसरात मधून निघाली दुपारी 2 वाजता आक्रोश मोर्चा काढला यात मोठ्या संख्येने महिला,मूल मुली यांनी सहभागी घेतला.
आरोपीवर कठोर करवाई ची मागणी करण्यात येत आहे.निषेध मोर्चा ला त्रिमूर्ती चौक येथे मार्गदर्शन करण्यात आले यात अमृत बनसोड,सदानंद इलमे,असित बागडे, चंद्रशेखर टेंभुर्णी, अजय मेश्राम,सुहास गजभिये, परमानंद मेश्राम यांनी मोरच्याला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन विनीत देशपांडे यांनी केले होते.
भंडारा बंद व निषेध मोरच्याला भंडारा शहरातील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने मोठा प्रतिसाद दिला सोबतच आंबडेकर जनतेनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिले परभणी घटनेचा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वर कार्यवाही करण्यात यावे अशी मागणी निवेदन देण्यात आले.
सविस्तर घटना अशी आहे की, परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बाबासाहेबांच्या पूतल्या समोरिल काचेच्या पेटितील संविधानाच्या प्रतिकृती ची सायं 4-5 च्या दरम्यान एका समाज कंटकाने विटम्बना केली. ही अपमानजनक घटना लोकांच्या लक्षात आल्यावर त्या कंटकाला चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा बंद ची हाक दिली, दुपारपर्यन्त बंद शांततेत पार पडला परंतु दुपार नन्तर काही असामाजिक तत्वांनी बंद ला गालबोट लावत दुकानांची तोड़फोड़ करीत हिंसाचार केला. पोलिसांनी त्यांना सोडून आम्बेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड़ करुन अटक करत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, एवढेच नव्हे तर पोलिसांनी सायंकाळी बौद्ध वस्तीत जावून निष्पाप लोकांना व महिलांना घरातून ओढुन मारहाण करुन कोम्बिंग ऑपरेशन केले.
बंद दरम्यान हिंसाचार व तोड़फोड़ करणाऱ्या पोलिसांचे व समाज कंटकाचे चित्रीकरण करणाऱ्या निरपराध, कायदयाचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांना बळजबरिने अटक करुन पोलीस कोठडित बेदम मारहाण करुन त्याचा खून केला, शांततेत आंदोलन करणाऱ्या विजय वाकोडे यांच्यावर एफ आय आर नोंदवला. पोलिसांकरवी होत असलेल्या मारहाण व मृत्यु चा धसका घेतल्यामुळे यांचा हृदयविकाराने मृत्यु झाला, या दोन्ही भीमसैनिकांच्या मृत्युस परभणी पोलिस च जबाबदार आहेत.
10 डिसेम्बर ला सकल हिन्दू परिवारातर्फे बांग्ला देशातील अल्पसंख्यक हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या मोर्च्यात तोड़फोडिचा आरोपी हा सहभागी होता, यावरून असे निदर्शनास येते की या मागचा सूत्रधार कोणी वेगळाच् व्यक्ति आहे, या सूत्रधाराचा शोध घेवून त्यांच्यावर सुद्धा कड़क करवाई करण्यात यावी.
दि 16 डिसेम्बर रोजी राज्यसभेत भारताचे गृहमंत्री यांनी आजकल एक फैशन हो गयी है, अम्बेडकर,अम्बेडकर, अम्बेडकर, अम्बेडकर, अम्बेडकर,अम्बेडकर करने का घोष करने की, इतनी बार किसी भगवान का नाम लेते तो सात जन्म में स्वर्ग मिल जाता” अशा प्रकारचे वक्तव्य करुन बाबासाहेब यांचा घोर अपमान केला. आमच्या करिता अम्बेडकर फैशन नसून आमच्या साठी सर्व भगवनापेक्षाही श्रेष्ठ आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा अश्या प्रकारचे बाबासाहेबांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. उपरोक्त सर्व गंभीर परिस्थिति लक्षात घेता आमच्या खालील मागण्या मंजूर करण्यात याव्यात.
मागण्या :-
1) परभणीतिल संविधान शिल्पा ची तोडफ़ोड़ करुन संविधानाचा अपमान करणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दखल करवा व त्याला कठोर शिक्षा करावी.
2) या घटनेतिल मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कार्यवाही करावी.
3) घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन योग्य चौकशी करुन कठोर करवाई करावी, व नोकरितून बरखास्त करावे.
4)आम्बेडकरी कार्यकर्त्यांवर लावलेले खोटे गुन्हे ताबड़तोब मागे घ्यावे.
5) पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन मुळे आम्बेडकरी वसत्यांचे प्रचंड न नुकसान झाले त्यांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे.
6) मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयाची मदत करुन परिवारातील एका व्यक्तिला शासकीय नोकरीत समावून घ्यावे.
7) मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यु ला कारणीभूत शरद मरे, अशोक घोरबन्द व तुरनाल या पोलीस अधिकाऱ्यान्ना ताबड़तोब निलंबित करुन चौकशी अन्ति कड़क करवाई करावी…
8) राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब अम्बेडकर यांचा घृणित शब्दात अपमान केला, प्रधानमंत्री यांनी गृहमंत्री अमित शाहा यांना मंत्रिमंडळालातून बर्खास्त करावे.
9) या परभणीतील प्रकारणाची न्यायालयिन चौकशी करण्यात यावी.
अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आले निवेदन नायब तहसीलदार सोनकुसरे ,मंडळ अधिकारी गेडाम यांनी स्वीकारले,हे निवेदन, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री कार्यालय येथे पाठविण्यात आले निवेदन देते वेळीस असीत बागडे विनय बनसोड अजय मेश्राम विनोद देशमुख , मयूर नंदेश्वर, सम्येक खोब्रागडे, शुभम रामटेके, सुरज डोंगरे,
चांद डोंगरे, रितिक वासनिक, मुकुल रंगारी, मृणाल रंगारी, अभि भगत,चेतन घोडीचोर, विक्की फुले, राहुल रामटेके, नीलिमा रामटेके.. सचिन बागडे, करण रामटेके, खोब्रागडे , रत्नमाला वैद्य , तथागत फुले, सुरज भालादरे ,नाशिक चौरे अजित बनसोड, सुगत शेंडे, डॉक्टर यशवंत मदामे, सुदेश वैद्य ,सुधाकर चव्हाण ,इंदिरा तिरपुडे,सनम गेडाम ,
सुरेश मुटकरे संजय मते संजय रामटेके ,राकेश शामकूवर ,सदानंद इलमे, राजपाल नाईक ,राधेश्याम तिरपुडे सम्यक गजभिये अमृत बनसोड किशोर मेश्राम, राजेश मेश्राम मयूर नंदेश्वर, परमनंट मेश्राम, चंद्रशेखर टेंभुर्णी,डॉ बाळकृष्ण सारवे, रोशन जांभूळकर, घायनचंद जांभूळकर ,ताराचंद उईके , दिलीव वानखेडे,संजीव भांभोरे, विजय भोवते,शिवदास गजभिये, हे तसेच मोठ्या संख्येने आंबेडकरी अन्याय उपस्थित होते .