दीड किलोमिटर वळण घेवूनही करता आले असते डायवर्शन..
संदीप कोकोडेच्या मृत्युस जबाबदार कोण?
रामटेक – राजु कापसे
नागपूर जबलपूर महामार्गावर भुरालटेक येथील उड्डाण पुलावर रस्ता उखरला आहे. त्याच्या दुरुस्ती करीता गरज नसतांना सहा किलोमिटरचा वळण रस्ता काढण्यात आला आहे. तो वळण रस्ता दीड किलोमिटरचाच करता आला असता परंतू विनाकारण इतका लांब रस्ता असल्याने करवाही येथील संदीप कोकोडे वय ३३ याला जीव गमवावा लागला. त्याच्या मृत्युस जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
करवाही येथील संदीप कोकोडे हा त्याच्या सासुरवाडी बोथिया पालोरा येथून करवाही येथे येत होता. वळण रस्त्याने तो जात होता. मानेगाव टेक येथे पोहचत असतांना अवघ्या १०० मिटर अंतरावर त्याला करवाही करीता उजवीकडे वळण घ्यायचे असल्याने तो वळणार तितक्यात विरुद्ध जबलपूर कडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला सामोरुन धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. त्यामुळे त्याच्या मृत्युस ओरीएंटक कंपनीच जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.
भुरालटेक उडाण पुलावर नित्कृष्ठ कामाने सळाखी बाहेर निघाल्या आहे.
तेथे काही दिवसाआधी काम सुरु होते. परंतू आता काम बंद आहे. तरीही वळण रस्ता गेल्या आठवड्यापासुन काढण्यात आला आहे. गेल्या दोन महिण्यांपासुन रस्ता उखडलेल्या ठिकाणी कठडे लावले आहे.तेथेही अनेक वाहणे आदळली आहे. जेव्हा की सळाखी निघालेल्या ठिकाण हे रस्त्याच्या मध्यभागी नसून एका बाजूला असल्याने कोणत्याही डायवर्शनची गरज नव्हती. तरीही सहा किलोमिटरचा वळण रस्ता काढण्यात आला.
सदर डायवर्शन हे बांद्रा ते मानेगावटेक असे सहा किलोमिटरचे आहे. त्यामध्ये दोन ठिकाणी याबाजूकडून त्याबाजूकडे निघण्याकरीता रस्ता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.
त्यापुलाला लागूनच कट असल्याने तेथून काढता आला असता. तसेच पुल संपल्यावर मोरफाटा जवळ पून्हा त्याच रस्त्यावर मार्ग वळवता आला असता परंतू हे दोन्ही कट पाईंट सोडून सरळ सहा किलोमिटर पर्यंंत या रस्त्याची वळण काढण्याची गरजच नव्हती. जर मोरफाटा पासुन डायवर्शन असते तर हा अपघात झालाच नसता.
वाहनांचा अमर्याद वेग अन् जीव मुठीत…
नागपूर जबवपूर महामार्गावर वाहणे अमर्याद वेगाने धावतात तर वाहणांची संख्या प्रचंड वाढल्याने रस्त्यावर दुचाकीने चालतांना जीव मुठीत घ्यावा लागतो. तसेच हा सहा किलोमिटर रस्ता व वाहणांचा वेग लक्षात घेता चालणे कठीण झाले आहे. वाहनांचा अमर्याद वेगाने दुचाकींना हवेने आपले वाहन सांभाळणे कठीण झाले आहे.