मुंबई – ऑक्सिलो फिनसर्व्हच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल लोन (ईआयएल) या व्यवसाय विभागाने शाळा आणि शैक्षणिक संस्थांसाठी ‘डायरेक्ट फंडिंग’ योजना जाहीर केली आहे. शाळा आणि शैक्षणिक संस्थांना संस्थेतील सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी थेट उपलब्ध व्हावा यासाठी खास ही योजना लागू करण्यात आली आहे.
“शाळा, महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थांना आपल्याकडील सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी, त्यात सुधारणा करण्यासाठी तसेच सर्वोत्तम शैक्षणिक पद्धती राबवणे आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण जपण्यासाठी निधीची आवश्यकता असते. भारतभरातील शाळांसोबत भागीदारी करून त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा पुरवण्यात साह्य करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे ऑक्सिलो फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सक्सेना म्हणाले.
‘डायरेक्ट फंडिंग’ योजनेअंतर्गत कंपनी वेबसाइटच्या माध्यमातून, कोणाही मध्यस्थाशिवाय ऑक्सिलोशी कर्जासाठी संपर्क साधणाऱ्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना ऑक्सिलो फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडतर्फे प्रोसेसिंग फीमध्ये २५ टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत भारतभरात सर्वत्र लागू आहे.
ऑक्सिलो ईआएल व्यवसाय विभागातर्फे प्ले-प्री स्कूल, के 12 स्कूल, बोर्डिंग स्कूल, कॉलेज, विद्यापीठ, व्यावसायिक महाविद्यालये आणि कौशल्यांवर आधारित प्रशिक्षणावर भर देणाऱ्या संस्था तसेच कोचिंग संस्थांना वित्तीय साह्य केले जाते.
नवे शैक्षणिक धोरण २०२० मुळे आता शाळांना त्यांच्या सोयीसुविधा विकसित कराव्या लागत आहेत. यात डिजिटल सोयी, प्रयोगशाळा, वाचनालये, स्वच्छता आणि क्रीडा सुविधा अशा अनेक सोयीसुविधांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक साधने पुरवण्याचा समावेश आहे.
हैद्राबादमधील बचपन अकॅडेमिक हाय स्कूल आणि लिटिल ट्युलिप्स हाय स्कूल, बेंगळुरुमधील श्री साई बाबा एज्युकेशन ट्रस्ट आणि एस.व्ही.एस. एज्युकेशनल ट्रस्ट तसेच जयपूरमधील विवेकानंद शिक्षा कमिटी अशा भारतातील अनेक संस्थांच्या या बदलात्मक प्रक्रियेत ऑक्सिलोने साह्य केले आहे.
तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये ऑक्सिलो ईआयएल व्यवसाय सक्रिय आहे.
“क्षमता वृद्धिंगत करणे, इमारतींच्या विस्तारासाठी जागा खरेदी करणे, शैक्षणिक सुविधा विकसित करणे आणि अधिक व्याजदराचे कर्ज बंद करणे अशा गरजांसाठी आम्ही शैक्षणिक संस्थांना वित्तसाह्य पुरवतो,” असे ऑक्सिलो फिनसर्व्हच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन लोन्सचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री नीरज शर्मा म्हणाले.येत्या पाच वर्षांत १०,००० हून अधिक शाळांना वित्तसाह्य पुरवण्याचा ऑक्सिलो फिनसर्व्हचा मानस आहे.