Saturday, December 21, 2024
Homeराज्यअपघातग्रस्ताला मदत केल्यास ध्वजारोहणचा मान तर बक्षीस म्हणून रोख रक्कम...

अपघातग्रस्ताला मदत केल्यास ध्वजारोहणचा मान तर बक्षीस म्हणून रोख रक्कम…

दोन तरुणांच्या मृत्यूमूळे बाभूळगाव ग्रामपंचायतचा ठराव…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील बाभुळगावाला अपघात मध्ये दोन युवकांना जीव गमवावा लागला. दोन परिवाराला घरामध्ये एकुलता एक मुलगा असलेल्या कुटूंबाला तरूण मुलाला गमावल्याचे पाहून अपघातग्रस्त तरुणाला मदत केल्यास ग्रामपंचायत चा ध्वजारोहण व रोख रक्कम देण्याचा ठराव गटग्रामपंचायत बाभूळगाव यांनी सर्वानुमते १३ डिसेंबर रोजी घेण्यात आला आहे.

या गावतील अनुप भालतीलक २१ वर्षीय तर मागील आठवड्यात माकड आडवे आल्याने उदय गोपाल गायकवाड २१ वर्षीय नामक दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत ने घेतलेल्या ठरावात गावतील सर्वत्र नागरिकांना आव्हान करण्यात आले कोणत्याही नागरिकाने अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास किंवा बाभूळगाव मधील कोणत्याही बाहेर ठिकाणी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करून सहकार्य केल्यास त्या व्यक्तीला गटग्रामपंचायत कार्यालय बाभूळगाव यांच्या वतीने शाल ,श्रीफळ ,व रोख रक्कम म्हणून अकरा हजार एकशे अकरा रुपये रक्कम देऊन ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करण्याचा मान त्या मदतकर्त्यास देण्यात येईल असे आव्हान करण्याचे ठरवले आहे.

हा ठराव घेण्यासाठी गावचे सरपंच मिराताई संजय पाचपोर, उपसरपंच अर्चना धाडसे,ग्रामपंचायत अधिकारी एस इंगळे,ग्रामपंचायत सदस्य किसनराव गावंडे,पूजा खरडे, अंकुश जाधव,संदेश धाडसे,रमेश डहाळे,गंगा भालतीळक,विद्या धाडसे,निना भगत,हरिदास पाचपोर,अलका घोसले तर ठराव मध्ये सूचक म्हणून सेवा सहकारी सोसायटीचे बाभूळगाव चे अध्यक्ष संजय पाचपोर यांनी केले तर अनुमोदक महेश गावंडे यानी दिले आहे.या ठराव मूळे गावकरी व परिसरात कौतुक होत आहे..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: