अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानाची 50 कोटींची जमीन तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशाने केवळ 960 रुपयांना विकण्यात आली होती. या आदेशाविरुद्ध दाखल अपील प्रकरणात, विद्यमान उपविभागीय अधिकारी, अमरावती यांच्या न्यायालयाने ११ डिसेंबर २४ रोजी “स्टेटस को” (स्थिती कायम ठेवावी) आदेश पारित केला आहे. या आदेशामुळे संबंधित जमीन तृतीय पक्षाला हस्तांतरित करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.
काय होते प्रकरण
श्री सोमेश्वर संस्थान, भाजी बाजार, अमरावती या धार्मिक संस्थांनच्या मालकीची मौजा पेठ अमरावती येथे सर्वे नंबर 94 ही शेत जमीन आहे. सदर जमीन हडप करण्याच्या हेतूने सुमन कोठारे हिने तहसीलदार अमरावती यांच्या समक्ष बेकायदेशीर प्रकरण दाखल केले होते.
सदर प्रकरणात तहसीलदार अमरावती विजय लोखंडे यांनी कुळ कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करून सदर जमीन महानगरपालिका हद्दीत येत असताना व महानगरपालिका हद्दीतील शेतजमिनींना तसेच धार्मिक व धर्मदाय संस्थांनच्या शेतजमीला कुळ कायदा लागू नसताना व प्रकरणात संस्थांनचा प्राथमिक आक्षेप निकाली न काढता तसेच कोणतेही साक्ष पुरावे न घेता संस्थांनच्या मालकीची 50 कोटी मूल्य असलेली सदर जमीन 960 रुपये मध्ये विक्री करण्याचा बेकायदेशीर आदेश दिलेला होता.या जमीन हडप करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध संस्थांन तर्फे अपील दाखल करण्यात आलेले होते.
निवडणुकी कालावधी दरम्यान अपील मध्ये सुनावणी घेण्यात आली नाही. परंतु निवडणुकी कालावधी दरम्यान मंडळ अधिकारी चतुर यांनी फेरफार प्रकरणी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कारवाई न करता बेकायदेशीरपणे फेरफार सुद्धा प्रामाणिक करून घेतला व जमिनीची भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 न करता वर्ग 1 ठेवण्यात आलेली होती. मंदिर महासंघाच्या पाठपुराव्यामुळे व तक्रारीमुळे सदरची जमिनीची भूधारणा पद्धती वर्ग-2 करण्यात आली होती
या प्रकरणात संस्थेची बाजू मांडण्यासाठी अॅडव्होकेट श्री रमणजी जयस्वाल यांनी युक्तिवाद केला. सुनावणी दरम्यान संस्थेचे विश्वस्त श्री राजेशजी असोरिया, श्री अमोल जी इंगोले, श्री रविंद्रजी डहाके तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी श्री अनुप जयस्वाल उपस्थित होते.या आदेशामुळे श्री सोमेश्वर संस्थानच्या जमिनीचे हक्क कायम राहण्यास मोठी मदत होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.