कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी( ता.निपाणी) गावचे सुपुत्र आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे पद्माकर पाटील आणी शशिकांत चौगुले यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल पुणे येथे कोगनोळी ग्रुपच्या वतीने सत्कार संपन्न झाला. या दोन्ही सत्कार मूर्तींनी 30 वर्षे विविध शासकीय विभागात मोलाचे योगदान देऊन जबाबदारी पार पाडली आहे.स्वागत दिपक पाटील यांनी केले तर प्रास्ताविक आनंद ऐवाळे यांनी केले.अभय गळतगे आणि जयसिंग पाटील यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन मान्यवरांचा सत्कार केला.
सरकारी विभागात काम करत असताना आलेले अनुभव तसेच कर्तव्य निष्ठ,प्रामाणिकपणे काम आणि त्यातून येणाऱ्या अडचणींवर मात करुत कसे यश मिळवायचे याचे मार्गदर्शन पद्माकर यांनी केले. तर नोकरी करत असताना उच्च शिक्षण सुद्धा महत्वाचे आहे. आणि आपली मुलेच आपली खरी गुंतवणूक असते असे शशिकांत यांनी सांगितले.सदर कार्यक्रम पुण्यातील हार्वेस्ट गार्डन क्लब येथे पार पडला असुन समिर पाटील यांनी नियोजन केले होते.सुत्रसंचालन बबन पाटील यांनी केले.
यावेळी संजय पाटील व अभय गळतगे यांनी कोरोना काळातील आपले अनुभव सांगताना काय काळजी घ्यावी यावर चर्चा केली . गेली अनेक वर्षे गावातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत, शालेय साहित्याची मदत, मराठी शाळेचा विकास, गावातून पुण्यात आलेल्या मुला-मुलींची राहण्याची सोय असे विविध उपक्रम कोगनोळीकर ग्रुप तर्फे राबवण्यात येणार आहेत त्यावर चर्चा झाली. यावेळी ग्रुपचे अजित मगदूम, संजय पाटील ,प्रवीण पाटील,जयसिंग पाटील, प्रताप पाटील, राजू माने, राजू चौगुले आदी उपस्थित होते.