बाळापूर – सुदीरआप्पा कांबेकर
गृहरक्षक (होमगार्ड) दलाचा ७८ वा वर्धापनदिन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्षणात बाळापूर येथे विवीध उपक्रमांनी साजरा करणात आला.
येथिल सिध्देश्वर हनुमान मंदिराच्या प्रांगणात गृहरक्षक दलाचा ७८ वा वर्धापनदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. उमेश जाधव प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विश्वजीत वानखडे , सुधीर कांबेकर , होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक डॉ संतोष धबाले, पलटन नायक डॉ आनंद घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर उपस्थित मान्यवरांनी गृहरक्षक दलाच्या वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा देऊन आपले विचार व्यक्त केले नंतर परिसरात साफसफाई अभियान राबवून, वृक्षारोपन करण्यात आले व प्रभात फेरी काढण्यात आली आयोजित कार्यक्रमात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मंगेश सपकाळ या होमगार्ड सैनिकाचा मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला संचालन प्रा. दत्ता दळी , तर आभार मोहसीन भाई यांनी व्यक्त केले यावेळी गृहरक्षक दलाचे सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.