चान्नी पोलिसांचे सुरू आहेत हवेत तीर
पातूर – निशांत गवई
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीसह पळ काढल्याची घटना आठवडाभरापूर्वि चान्नी पोलीस ठाण्यात घडली होती. तेव्हापासून चांन्नी पोलिसांचे हवेत तीर मारणे सुरू असून अद्याप आरोपीचा थाग पत्ता लागला नाही.पीडित मुलगी ही त्याच्यासोबत बेपत्ता असून तिचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल पिढीतेच्या पालकाकडून केला जात आहे .
आरोपीने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी चान्नी पोलिस ठाण्यात ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल होता. त्याच्या चौकशीसाठी अल्पवयीन मुलीसह दोघांना चौकशीसाठी शुक्रवारी, २९ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता बोलावण्यात आले होते. दुपारी २ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोघेही चान्नी ठाण्यात होते.
अल्पवयीन मुलगी आणि मुलाचे आई-वडील हे सुद्धा सायंकाळी निघून गेले याची कुठलीही माहिती पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांना नव्हती जेव्हा हा प्रकार उजेडात आला तेव्हा ठाण्यातील सर्वांच्या दातखड्या बसल्या दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून विचारणा आणि पोलीस ठाण्यातून अल्पवयीन प्रेमियुगल बेपत्ता या सर्व गडबडीमुळे संपूर्ण चान्नी पोलीस ठाणे हादरले त्यानंतर सारवासावर करण्यासाठी आरोपीच्या पित्यालाच सह आरोपी करून अटक केली दुसऱ्या दिवशी त्यांची ही जामीनवर सुटका झाली या घटनेवर आठ दिवस उलटून गेले असले तरी अद्यापही पोलिसांचे हात खालीच आहेत सदर बेपत्ता झालेले अल्पवयीन प्रेमियुगल अजून पोलिसांच्या कोसो दूर आहे यावरून चान्नी पोलिसांची पोच कुठर्यंत आहे हे दिसून येते. पोलीस प्रशासनाची लप्तरे वेशीवर टांगलेली असताना सुद्धा सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी हातावर हात ठेवून बसलेले आहेत.
आतापर्यंत आरोपीचा शोध लागलेला नाही परंतु चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे
रवींद्र लांडे ठाणेदार चान्नी 31 ऑक्टोबर रोजी विवरा येथील एका घटनेच्या गुन्ह्यात साक्ष का दिली या कारणावरून विवाहित महिलेसह पतीवर गावातील सहा लोकांनी प्राणघातक हल्ला करून मारहाण केली होती.
या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे परंतु घटनेला एक महिना होऊन सुद्धा तीन आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत आहेत या प्रकरणांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोपी पीडित महिलेने केला आहे.