Wednesday, December 4, 2024
Homeराज्यरामटेक | तालुकास्तरीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेत रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम...

रामटेक | तालुकास्तरीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेत रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम…

रामटेक – राजू कापसे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे तसेच समाज कल्याण, नागपूर व परिवर्तन विचार मंच, रामटेक यांच्यावतीने 75 व्या संविधान दिनानिमित्त घरघर संविधान सप्ताह उपक्रमाच्या समारोप कार्यक्रम निमित्त तालुकास्तरीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा दिशा व दृष्टी बहुउद्देशीय संस्था रामटेक येथे आयोजित करण्यात आली होती.

सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला मल्यार्पण करण्यात आले तसेच सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन घेण्यात आले आणि राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमात रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक येथील विद्यार्थी न्याय मंडळ गटात समाविष्ट होते त्यात अमोल केळवदे, पार्थ हटवार व दिनेश दूधकवरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सागर पशुधन व्यवसाय व दुग्धोत्पादन महाविद्यालय,खुमारी येथील कायदे मंडळ गटात समाविष्ट विद्यार्थी अभिजीत चांदुरकर, विवेक गराट व प्रशांत लोणारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर जनप्रभा शैक्षणिक संकुल,रामटेक येथील अंजली वघारे, अश्विन उईके व सोपान डडमल यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी तर परीक्षण कार्य मौदा तालुका समतादूत ओमप्रकाश डोले व दुर्योधन बगमारे तसेच परिवर्तन विचार मंचाचे सचिव राहुल जोहरे यांनी सांभाळले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच संविधान प्रास्ताविकाची प्रत देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धकांना ज्ञात नसलेल्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या उपस्थितांना संविधान उद्देशिकेचे प्रत देऊन गौरवण्यात आले. प्रसंगी प्राध्यापिका निकिता अंबादे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे अर्थासह स्पष्टीकरण विशद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अंशुल जयस्वाल, प्राध्यापक राजेंद्र कांबळे, चंद्रशेखर पौनीकर, ज्ञानेश्वर नेवारे, अमित हटवार, निकिता अंबादे, देवानंद नागदेवे यांनी भरीव सहकार्य केले. याप्रसंगी योगिनी तिमांडे,तविनी येऊतकर,चेतना उईके,किरण शेंद्रे,शालू वानखेडे,आकाश मोहबिया व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: