बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापूर विधानसभा मतदार संघामध्ये नुसता महाविकास आघाडीचा आमदार नसून या मतदार संघातील तीन लाख मतदारांचा मी आमदार आहे,असे मत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ.नितीन देशमुख यांनी बाळापूर येथे सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
पुढ़े बोलताना आ. देशमुख म्हणाले, की बाळापूर विधानसभा मतदार संघामध्ये पाच वर्षामध्ये आपल्याला जातीवाद निर्माण करायचा नसून हिंदू मुस्लीम ही एकता दाखवून द्यायची आहे. सदैव गोरगरीब जनतेच्या कामासाठी तत्पर राहणार असून येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मतदार संघाचा कायापालट करणार असल्याचे मत नवनिर्वाचित आ. नितीन देशमुख यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
सत्कार समारंभ कार्यक्रमला शिवसेना नेते सेवकराम ताथोड,कॉँग्रेस नेता डॉ. रहेमान खान, शहर प्रमुख आनंद बनचरे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने,करणसिंह ठाकूर, सुभाष धनोकार,रहेमतुल्ला, शोएब भाई, माजी नगरध्यक्ष जम्मु शेठ, माजी नगरसेवक डॉ. फैयाज हुसेन, मो.अक्रम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, जनसेवक बबलू देशमुख, शिवाजी म्हैसने, भूषण गुजराथी, अनिल धनोकार , सुरेंद्र धोपटे यांच्यासह मान्यवर सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी सेवकराम ताथोड, जम्मुशेठ, डॉ. फय्याज हुसेन, मो. अक्रम , मतीन ठेकेदार यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला बाळापूर शहरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविकास आधाड़ीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले