मुर्तिजापूर – विलास सावळे
मूर्तिजापूर शहरातील आशीर्वाद नगर येथे राहणाऱ्या शुभम विलास गावंडे (वय 25) यांच्या कॅनरा बँक खात्यातून जवळपास ₹60,000/- गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुभम गावंडे हे इलेक्ट्रिशियन असून, हातमजुरीवर उदरनिर्वाह करते , दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 1.45 वाजता शुभम यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला, ज्यात त्यांच्या बँक खात्यातून सहा वेळा रक्कम कापल्याची माहिती मिळाली. या व्यवहारांचा तपशील
- ₹49,999
- ₹1,999
- ₹1,999
- ₹1,999
- ₹1,999
- ₹1,999
एकूण रक्कम ₹59,994 इतकी आहे.
घटनेनंतर शुभम यांनी तातडीने कॅनरा बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र बँकेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुभम यांनी थेट मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
मुर्तिजापूर शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, बँक खात्यातूनही पैसे गायब होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.