अध्यक्ष धनराज बडोले नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर…
नागपूर – राजू कापसे
राजगृह फाउंडेशन बेसाव्दारा आयोजित २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त भव्य भारतीय संविधान सम्यक ज्ञान वृध्दी स्पर्धा व मोफत भारतीय संविधान ग्रंथ वाटपाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शुभम इंगळे सर आणि प्रमुख पाहुणे डॉ. यशस्वी सातपुते मॅडम (जिल्हा रुग्ण अधिकारी), ऍड. आकाश मुन सर (समाज सेवक), राजगृह फाउंडेशन बेसा नागपूर अध्यक्ष धनराज प्रेमराज बडोले सर, लोखंडे सर, पाटील सर, राजू शेंडे सर, निखिलेश कांबळे सर, बागडे सर, गणवीर सर, कीर्ती बडोले मॅडम हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यात 150 विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान सम्यक ज्ञान वृध्दी स्पर्धा ठेवण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस देखील देण्यात आले. इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर संविधान सन्मान पत्र देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
विशेष म्हणजे लकी ड्रा काडून 30 विद्यार्थ्यांना भारतीय संविधान ग्रंथ लोखंडे फाउंडेशन तर्फे देण्यात आले. या कार्यकामात 200-250 लोकांनी हजेरी लावली. सर्व विशेष पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शुभम इंगळे सर यांनी संविधान हे एक पुस्तक व नियम नसून भारतीय नागरिकाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. असे आपल्या भाषणात बोलतांना म्हंटले.
तसेच प्रमुख पाहुणे डॉ. यशस्वी सातपुते मॅडम (जिल्हा रुग्ण अधिकारी) यांनी संविधान म्हणजे भारताच्या राज्यव्यवस्थेचा कारभार चालविण्याची किल्ली आहे असे प्रतिपादन केले. तसेंच ऍड. आकाश मुन सर (समाज सेवक), यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधन करताना सांगितले कि राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून जो देशाप्रती आपले कर्तव्य पूर्ण करतो तो खरा नागरिक आहे.
अशाप्रकारे प्रकारे प्रमुख पाहुण्यांचे मोलाचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञानात भर करण्याचे कार्य केले. भारतीय संविधान दिन हा कार्यक्रम चार वर्षांपासून सतत सुरु आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष राजकुमार बडोले सर यांनी केले तर आभार कीर्ती बडोले मॅडम यांनी केले. अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.