चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
डॉ.अमन उपगन्लावार हे मुळचे बल्लारशाह ( विदर्भ ) असून, सध्या ते नाशिकच्या चांदवड येथील नावाजलेल्या एसएनजेबी संचलित श्रीमान सुरेशदादा जैन फार्मसी महाविदयालयात उपप्राचार्य तसेच फार्माकोलोजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
नुकत्याच जोधपूर ( राजस्थान) AIIMS, येथे २१ ते २४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय वैदकीय विज्ञान अकादमी (NAMS) दिल्ली, या संस्थेच्या ६४ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात भारताचे महामहिम उपराष्ट्रपती डॉ.जगदीप धनकर यांच्या उपस्थित व मॅडम सलिला श्रीवास्तव ( सचिव, आरोग्य व कुंटुंब कल्याण मंञालय भारत सरकार) यांच्या शुभहस्ते फेलोशीप (FAMS) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना डॉ. अमन यांनी सांगितले की, हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण असून हा प्रतिष्ठीत पुरस्कार मिळविणारा देशातील फार्मसी क्षेञातील या वर्षी मी एकमेव व्यक्ति असल्याचा मला गौरव व आनंद वाटतो असे नमूद केले.
डॉ.अमन उपगन्लावार यांना संशोधन आणि अध्यापन कामाचा २१ वर्ष इतका प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी १०० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिके/ मासिकांमध्ये डॉ.अमन उपगन्लावर यांचे लेख प्रसिध्द झालेले आहे.
डॉ.अमन यांनी लिहिलेली आतापर्यंत चार पुस्तके जागतिक स्तरावरील प्रकाशनांतर्फे प्रकाशित झालेली आहे. डॉ.अमन उपगन्लावार हे सध्या देशातील अग्रण्य समजल्या जाणा-या क्रांतीज्योती साविञीबाई फुले विदयापीठ पुणे येथील अभ्यासमंडळावर नियुक्त असून कार्यभार बघत आहे तसेच ते संशोधनाचे (PhD) मार्गदर्शक सुद्धा आहे.
डॉ. अमन यांच्या फार्मसी क्षेञातील आजवरील उल्लेखनीय अध्यापन,संशोधन व सादर केलेल्या शोधनिबंध महत्वपूर्ण कार्याची दखल घेत राष्ट्रीय वैदकीय विज्ञान अकादमी, दिल्ली यांच्याकडून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जोधपूर येथे दीक्षांत समारोह प्रसंगी फेलोशीप प्रदान करुन डॉ. अमन उपगन्लावार यांचा गौरव करण्यात आला. याबद्दल डॉ. अमन यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.