जय-पराजयाचा महाव्हाईस ने घेतलेला आढावा…
चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
काही तूरडक घटना वगळता जिल्ह्यात शांततेत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधडेल? याची उमेदवारांसह मतदारांनाही उत्सुकता लागली असून आमच्या सर्वे नुसार सटीक निष्कर्षा पर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे…
चंद्रपूर विधानसभा क्षेत्र
या विधानसभेत विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी 2019 मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करत काँग्रेस-भाजपा उमेदवारांचा धुव्वा उडवत विजय संपादन केला होता.यावेळी त्यांनी भाजप चे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढली आहे.काँग्रेस चे अधिकृत उमेदवार प्रवीण पडवेकर यांनी जोरगेवारांना कडवी झुंज दिली असली तरी,काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजू झोडे,भाजपचे बंडखोर उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांच्या उमेदवारीने विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे कठीण असले तरी जोरगेवारांची मोर्च्या बांधणी,चांदा ब्रिगेट या त्यांच्या संघनेच्या सहकार्यामुळे ते विजयी होणार असल्याची चिन्हे आहेत.
चिमूर विधानसभा क्षेत्र
या विधानसभा क्षेत्रात भाजपचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया हे विजयाची हॅड्रिक मारतील असे चित्र असतांनाच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश वारजूरकर यांनी प्रचारात घेतलेली मुसंडी,सामान्यातून सामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचा केलेला प्रयत्न,राहुल गांधी यांची सभा,विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांचे मार्गदर्शन यामुळे चिमूर विधानसभेत बंटी भांगडिया यांचा विजयी रथ थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे…आमच्या सर्वे नुसार काँग्रेसचे उमेदवार सतीश वारजूरकर यांचा विजय होऊ शकतो…
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र
विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कुणबीलॉबी उभारत वड्डेट्टीवार यांना घरचा आहेर दिला आणी भाजपने त्याला कैश करत कृष्णलाल सहारे यांना उमेदवारी दिली….मात्र अपेक्षाकृत सहारे हे मतदारांचे मन वळवण्यात यशस्वी झाले नसल्याने यापुढेही विजय वड्डेट्टीवरांचा विजयी रथ विजयाची घोड दौड पूर्ण करत विजय संपादन करेल,अशी स्थिती आहे.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र
जिल्ह्याच्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी आपल्या लाडक्या भावाला आमदार बनविण्यासाठी दिल्ली दरबारीं आपली ताकत झोकून प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली खरी;पण विजयाची माळ काकडेंच्या गळ्यात पडेल असे वाटत नाही.
दीर अनिल धानोरकर यांनी वंचीतचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला,आणी काकडेचे गणित बिघडले.मुकेश जिवतोडे (अपक्ष) विरुद्ध करण देवतडे (भाजप) अशी या क्षेत्रात दुहेरी लढत झाली असून,अपक्ष उमेदवार,मतांचे विभाजन याचा फायदा भाजप उमेदवार करण देवतडे यांना होतांना दिसत आहे.सर्वे नुसार भाजपचे करण देवतडे विजयी होण्याची चिन्हे आहेत.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र
विधान सभेतील सुसज्ज इमारती,रोड,नाली,सिमेंट रस्ते,बगीचे,क्रिडांगणं अशा विविध विकास कमानी जिल्याचे नाव महाराष्ट्रभर करणाऱ्या ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी ठरली नाही…प्रामुख्याने सिंचन,बेरोजगारी या दोन प्रमुख मुद्यांना शस्त्र बनवत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संतोषसिंग रावत मैदानात उतरले.महागाई,बेरोजगारी हे मुद्दे तर ज्वलन्त आहेच!शिवाय मुनगंटीवार यांनी अनेकदा मंत्री पद भोगूनही स्थानिक बेरोजगारांसाठी काय केले?
हा प्रश्न उपस्थित करून त्यांना कोंडीत पकडले.काँग्रेस घराघरात पोहचली…भाजपात कार्यकर्ते कमी आणी नेतेच जास्त असल्याने मुनगंटीवार यांचा ‘विकास’ पाहिजे त्या प्रमाणात सामान्य मतदारा पर्यंत पोहचला नाही.
काँग्रेसला बेरोजगारी आणी सिंचणाचे आयते कोलीत मिळाले.भाजपला लाडक्या बहिणीचा विशेष लाभ होतांना दिसला नाही.त्यामुळे या चुरशिपूर्ण लढतीत मुनगंटीवार यांच्या विजयी घोड दौडीला लगाम लागून काँग्रेसचे संतोष रावत विजयी होऊ शकतात…
राजुरा विधानसभा क्षेत्र
काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे तथा परिवर्तन पॅनल चे अधिकृत उमेदवार एड.वामनराव चटप यांच्यातच घरी लढत असून भाजपचे देवराव भोंगळे तिसऱ्या क्रमांकावर असणार आहेत.एड.वामनराव चटप या विधानसभा क्षेत्रात सातत्याने सक्रिय असून सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून यांची या क्षेत्रात छाप आहे.
सततचा जनसंपर्क,आयती उमेदवार म्हणून भाजपच्या दोन माजी आमदारांनी देवराव भोंगळे यांचा केलेला विरोध या मुळे एड.वामनराव चटप यांची बाजू भक्कम मानली जात असून या चुरशीच्या लढतीत निसटता का होईना वामराव चटप यांचा विजय निश्चित मानला जात आहे…