Tuesday, December 3, 2024
Homeराज्यप्रख्यात रामनगरीत १४ नोव्हेंबरला भव्य शोभायात्रेचे आयोजन...

प्रख्यात रामनगरीत १४ नोव्हेंबरला भव्य शोभायात्रेचे आयोजन…

वैकुंठ चतुर्दशी निमित्य यंदा होणार ४३ वी शोभायात्रा…

शोभायात्रेवर निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निर्बंधांचे सावट…

रात्री १० च्या आत आटपवावा लागणार कार्यक्रम…

रामटेक – राजु कापसे

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीमध्ये दरवर्षी त्रिपुरा पोर्णिमा दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यंदा येत्या १४ नोव्हेंबर ला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मात्र यंदा आगामी विधानसभा निवडणुकीचे व आचारसंहितेचे सावट पडल्यामुळे रात्री दोन ते तिन वाजतापर्यंत चालणारा कार्यक्रम दुपारी ४ वाजता सुरु होवुन रात्री दहा च्या आत आटपवायचा असल्याची माहिती भारतीय जनसेवा मंडळातर्फे माहिती देतांना सांगण्यात आले.

शोभायात्रेमध्ये ५० च्या जवळपास झाक्यांचा समावेश राहात असतात व हे दृष्य पहाण्यासाठी शहरासह आसपाच्या गावातील हजारो लोक यावेळी येथे आपली हजेरी लावत असतात. एवढेच की काय तर येथील परगावी असलेल्या विवाहीत मुली कार्तीक पोणिमेदरम्यानच येथे येत असतात हे येथे विशेष.

रामनगरीतील शोभायात्रा दुरवर प्रसीद्ध आहे. शहरामध्ये या वर्षी ४३ व्या शोभायात्रेचे येत्या १४ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता भारतीय जनसेवा मंडळाद्वारे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले. शोभायत्रेची सुरुवात स्वर्गीय संत गोपाल बाबा यांनी केली, त्यांनी तब्बल ३९ वर्षे ती उत्तम प्रकारे चालवली.

भारतीय जनसेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी झाक्यांची शोभायात्रा निघते. या झांक्या अठराभुजा गणेश मंदिरापासून निघत असते. भारतीय जनसेवा मंडळचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, महासचिव माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर,

सहसचिव सुभाष बघेले, सदस्य धनराज काठोके, अशोक पटेल, नत्थू घरजाळे, शंकरराव चामलाटे, विनायक डांगरे, ऋषिकेश किमतकर यानी शोभायात्रा सुचारू व वेळेवर करण्याचे आवाहन नागरिकांना व झाकी समितिला केले आहे. यानंतर त्रिपुरी पौर्णिमा असून रथयात्राही निघणार आहे. यानंतर मंडईचे कार्यक्रम सुद्धा होणार आहेत.

असे राहाणार पुरस्कार….

विशेष बाब म्हणजे ग्रुप एक मध्ये ९ ट्रक झाँकी करिता ₹ २१०००/- , ग्रुप दोन मध्ये १२ ट्रकटर झाँकी करिता ₹ ११०००/-, ग्रुप तीन मध्ये ७ पैदल झाँकी करिता ₹ ६५००/- त्या त्या ग्रुप मधे समान पुरस्कार राशी राहणार आहे. इतर झाकिंना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येईल. आचार सहिता असल्याने शोभायात्रेचे रात्री 10 वाजता वेळेवर  समापन होईल.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: