Tuesday, December 3, 2024
Homeराज्यवरोऱ्यातील मटण पार्टीत विहिरीत पडून एकाचा मृत्यू...

वरोऱ्यातील मटण पार्टीत विहिरीत पडून एकाचा मृत्यू…

अपघात की घातपात? चर्चेला उधाण…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

निवडणुकीच्या या रणधुमाडीत धन्नासेठ उमेदवारांनी आपल्या तिजोऱ्या उघडल्या असून मतदारांना विविध आमिषे देऊन आपला विजय निश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच चिकन मटणाच्या ओल्या पार्ट्याची मेजवानी दिली जात आहे.अशातच वरोरा येथील फत्तापूर गिट्टी क्रेशर परिसरात ठेकेदार प्रमोद मगरे यांनी एका उमेदवाराच्या प्रचारार्थ ओल्या मटण पार्टीचे आयोजन केले होते.

दरम्यान याच परिसरात असलेल्या विहिरीत येथील अरुण महले आणी गजानन काळे तोल जाऊन पडले.अरुण महले याला वाचवण्यात यश आले पण गजानन काळे यांना विहिरीतच जल समाधी मिळाली.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून,हा अपघात,की घातपात?असा प्रश्न उपस्थित केल्या जात असून,या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा,तथा मृतकाच्या कुटुंबंियाला सबंधित उमेदवारा कडून तातडीची आर्थिक मदत द्या अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: